जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / पत्नीला फिरवायला नेत होता, वाटेत दरोडेखोर आले अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक

पत्नीला फिरवायला नेत होता, वाटेत दरोडेखोर आले अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक

पत्नीला फिरवायला नेत होता, वाटेत दरोडेखोर आले अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक

मारामारी, खून, लुटमार यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

संतोषकुमार गुप्ता (छापरा), 17 मे : बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये मारामारी, खून, लुटमार यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान बिहारच्या सारण जिल्ह्यात गुन्हेगार पूर्णपणे निर्भय झाले आहेत. सातत्याने खून, लुटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सारण जिल्ह्यातील साधपूर गावाजवळ दरोड्यादरम्यान गुन्हेगारांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत मृत महिलेचा पतीही जखमी झाला आहे. दीपक प्रसाद आणि 25 वर्षीय पत्नी निशा कुमारी असे या दोघांचे नाव आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जाहिरात

दीपक प्रसाद म्हणाले की, पत्नी निशा कुमार आणि मुलग्याला घेऊन जात होते यावेळी साधपूर गावाजवळ माझ्यावर अचानक हल्ला झाल्याचे ते म्हणाले. यामध्ये 5 ते 6 गुन्हेगार असल्याचे प्रसाद यांनी सांगितलं. चोरट्यांनी दुचाकी थांबवून खिशातील मोबाईल आणि 5 हजारांची रोकडही लंपास केली.

News18लोकमत
News18लोकमत

या दरम्यान गुन्हेगाराने पत्नीची बॅग हिसकावून घेण्यास सुरुवात केली. पत्नी निशाने विरोध केला असता, गुन्हेगारांनी गोळीबार केला. यामध्ये निशा यांना  गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान रस्तावरील लोकांना महिलेस रुग्णालयात उपचारासाठी आणले परंतु तिला रुग्णालयात तपासाअंती मृत घोषीत करण्यात आले. या घटनेत दीपक प्रसाद यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस फौजफाट्यासह रुग्णालयात पोहोचले, यावेळी मृत महिलेच्या पतीला घटनेबाबत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर एफआयआर नोंदवण्याची कारवाई सुरू आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे एसपी गौरव मंगला यांनी सांगितले. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. लवकरच गुन्हेगारांना पकडण्यात येईल.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात