जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, तिघे जेरबंद

शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, तिघे जेरबंद

दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर या वर्षी साईभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला

दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर या वर्षी साईभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला

पुलवामा घातपातानंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा (Bomb blast planning at saibaba temple in shirdi) दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदनगर, 15 फेब्रुवारी: दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा (Pulwama terrorist attack) याठिकाणी आतंकवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा (Bomb blast planning at saibaba temple in shirdi) दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची रेकी केल्याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांच्या कटाची माहिती समोर येताच शिर्डीत खळबळ उडाली असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी असं अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं असून ते दुबईतून भारतात आले होते. त्यांनी घातपात घडवण्यासाठी शिर्डी येथील साईबाबा मंदिराची रेकी केली होती. संबंधित सर्व दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे. हेही वाचा- नांदेड: ‘ते’ गाणं ऐकताच ढासळलं मानसिक संतुलन, तरुणाच्या मनात आला सुसाईडचा विचार यासोबतच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी एका हिंदी चॅनेलच्या संपादकाच्या शिर्डीतील घराची देखील रेकी केली होती. गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने कारवाई करत संबंधित तिन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटक पदार्थ आढळून आले आहेत. या प्रकरणी एटीएसने आतापर्यंत एकूण आठजणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. हेही वाचा- RPI पदाधिकाऱ्यावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्यांनी झाडल्या गोळ्या, नाशिकमध्ये खळबळ खरंतर, शिर्डी हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून करोडो भाविक दरवर्षी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते.   संवेदनशील देवस्थान असणाऱ्या साई मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याबाबत धमकीचे निनावी पत्र, तसेच मेल यापूर्वी देखील अनेकदा आले आहे. अशात दुबईहून आलेल्या तीन दहशतवाद्याने दिलेल्या धक्कादायक कबुलीनंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात