अमित राय/ मुंबई, 2 ऑक्टोबर : कांदिवली भागात गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आहे. युट्युबवर गोळीबाराचे प्रशिक्षण घेऊन आरोपींनी गोळीबार केला होता. विशेष म्हणजे या दोघांनाही गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे गोळीबार करून फरार झालेल्या 2 आरोपींना कांदिवली गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने गुजरात मधील बिल्मोर येथून अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष 11 च्या पथकाने अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केली आहे. परवा रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोनू पासवान यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर तीन जखमी झाले होते. बुलढाण्यातले शातिर चोर, ज्वेलर्सच्या दुकानात भामट्यांचा हात, पाहा VIDEO सोनू चंद्रभान पासवान (27) आणि सुरज रामकिशन गुप्ता (20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून परिसरात दहशत माजवण्यासाठी पासवान नावाची टोळी सक्रिय होती. यापूर्वी देखील सोनू पासवानने सात सप्टेंबर रोजी मारामारी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय बिहारमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीपूर्वी आरोपींनी युट्युबद्वारे गोळीबाराचे प्रशिक्षण घेऊन परवा मध्यरात्री कांदीवली लालजीपाडा परिसरात गोळीबार करत पासवान टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण यांच्या पायाला गोळी लागली आहे. सोनू पासवानने देशी पिस्तुलातील सर्व गोळ्या या चौघांवर झाडल्या. सोनू पासवान यावेळी दारूच्या नशेत होता. क्षुल्लक कारणावरुन गोळीबार… कांदिवलीजवळील लिंक रोडवर काही दिवसापूर्वी ही मुलं जिलेभी खात होते. तेथे एक तरुणीदेखील होती. त्यावेळी सोनू पासवान आपल्या काही साथीदारांसह तेथे पोहोचला. सोनू आणि त्याच्या साथीदारांनी तेथील एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात एक तरुण गंभीर झाला होता. शुक्रवारी रात्री जेव्हा सर्वजण नवरात्रीच्या दांडिया खेळण्यात व्यग्र होते, तेव्हा सोनू पासवान मोंटूचा सूड उगवण्यासाठी दारूच्या नशेत त्या भागात पोहोचला. यावेळी सोनूने त्या मुलांवर गोळीबार केला. यानंतर सोनू आपल्या मित्रांसह फरार गुजरातच्या ट्रेनने फरार झाला होता. शेवटी पोलिसांनी सोनू पासवान आणि सूरज गुप्ता या दोघांनाही गुजरातमधून अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.