Home /News /crime /

उच्चशिक्षित तरुणीचं जडलं दूधविक्रेत्यावर प्रेम; संसार थाटताच घडला भयानक प्रकार

उच्चशिक्षित तरुणीचं जडलं दूधविक्रेत्यावर प्रेम; संसार थाटताच घडला भयानक प्रकार

हिमांशू जोशी हा नीतूच्या घरी दूध देण्यासाठी येत असे. याआधी दोघे कधीच बोलले नव्हते. पण, दूध दिल्यानंतर एक महिन्यानंतर नीतूने हिमांशूच्या नंबरवर डिजिटल पेमेंट केले.

    इंदूर, 3 जुलै : मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये लग्नानंतर फसवणूक (Fraud After Marriage) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका ग्रॅज्युएट झालेली मुलीला तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात (Graduate Girl Marriage with Milk Seller Guy) पडली. मोबाइल वर डिजीटल पेमेंट करता-करता दोघांचे सूत जुळेल आणि इतकेच नव्हे तर दोघांनी लग्नही केले. मात्र, त्यानंतर तिचा प्रियकर पती हा गायब झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय आहे प्रकरण -  या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. तर तिचा पती हा शहर सोडून मुंबईला फरार झाला आहे, असे तपासात समोर आला आहे. बाणगंगा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. इंदूरच्या बाणगंगा पोलिसांनी (Banganga Police Station) सांगितले की, नीतू जोशी नावाच्या मुलीने तिच्याच पतीविरोधात गंभीर तक्रार केली आहे. तक्रारीनंतर बाणगंगा पोलीस ठाण्यात पती हिमांशू जोशी याच्याविरुद्ध फसवणूक आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलवर पेमेंट केल्यानंतर जुळलं सूत -  मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू जोशी हा नीतूच्या घरी दूध देण्यासाठी येत असे. याआधी दोघे कधीच बोलले नव्हते. पण, दूध दिल्यानंतर एक महिन्यानंतर नीतूने हिमांशूच्या नंबरवर डिजिटल पेमेंट केले. या पेमेंटसाठी दोघांनी एकमेकांचे नंबर सेव्ह केले. त्यानंतर हिमांशू कधी-कधी मुलीला मेसेज करायचा. या बहाण्याने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. नीतू आणि हिमांशूमधील बोलणे वाढले आणि तिने़ दूध विक्रेत्या हिमांशू आणि नीतूचा एकमेकांवर जीव जडला. प्रेमानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि इतकेच नव्हे तर लग्नही केले. पत्नीला न सांगता निघून गेला -  लग्न होईपर्यंत दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतरही हिमांशूने पत्नी नीतूला एकदाही घरी नेले नाही. तो आपल्या पत्नीला वचन देत राहिला की लवकरच सर्व काही ठिक होईल आणि त्यानंतर दोघेही एकत्र राहू. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले. मात्र, एके दिवशी पती पत्नी नीतूला न सांगता अचानक गायब झाला. यानंतर नीतूने एअरपोर्ट रोडवरील हिमांशूचे घर गाठले. तर तिथे तो बाहेर असल्याची माहिती तिला त्याच्या कुटुंबीयांना दिली. हेही वाचा - संतापजनक! फेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर प्रेमात, नंतर प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार यानंतर नीतू त्याला सतत फोन करत राहिली. मात्र, त्याने उत्तर दिले नाही. डिसेंबरमध्ये हिमांशूने फोन करून सांगितले की, तो कामानिमित्त मुंबईत आहे आणि लवकरच परत येईल. मात्र, यानंतरही तो सतत खोटे बोलत राहिला. त्यानंतर त्याने नीतूसोबत बोलणेही बंद केले. अनेक प्रयत्न करूनही हिमांशूकडून प्रतिसाद न आल्याने अखेर ती नातेवाईकांकडे गेली. मात्र, कुटुंबीयांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर नीतूने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Indore News, Love story

    पुढील बातम्या