धक्कादायक! घरात सुरू होती लक्ष्मीपूजनाची तयारी आणि कुटुंबात सुरू झाला अंदाधुंद गोळीबार, 2 जणांचा मृत्यू

धक्कादायक! घरात सुरू होती लक्ष्मीपूजनाची तयारी आणि कुटुंबात सुरू झाला अंदाधुंद गोळीबार, 2 जणांचा मृत्यू

अद्यापही गोळीबार का करण्यात आला, याचं कारणं समजू शकलेलं नाही. गोळीबार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • Share this:

समस्तीपूर, 15 नोव्हेंबर : शनिवारच्या रात्री सर्व जण दिवाळी साजरी करत होते. एकमेकांना दिपावलीच्या शुभेच्छा देत, आपल्या घरात दिव्यांची आरास करत होते. तर दुसरीकडे बिहारमधील समस्तीपूर येथे काही लोकांनी दिवाळीचा आनंदच, दु:खात बदलला. समस्तीपूरात दहापेक्षा मोठ्या संख्येने आलेल्या टोळीमुळे परिसरात एकच खळबळ माजली.

आयबी रोड नवादा गावात चहा दुकानदार सुमित कुमार राय यांच्या घरात घुसून काही लोकांनी अंधाधुंद फायरिंग सुरू केली. ज्यावेळी हे लोक घरात घुसले त्यावेळी, सुमित यांचं संपूर्ण कुटुंब लक्ष्मी पूजनाची तयारी करत होतं. त्याचवेळी कुटुंबियांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन जणांना गोळी लागली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर पाच लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोळी लागून मृत्यू झालेल्यांमध्ये 60 वर्षीय एका महिलेचा आणि एका आठ महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. तीन महिलांसह पाच लोक जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर, स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, गोळीबाराची घटना जिथे घडली, तेथून पोलीस स्टेशन अगदी जवळ आहे. असं असतानाही अज्ञातांकडून बेछूट गोळीबार, हल्ला करण्यात आला. अद्यापही गोळीबार का करण्यात आला, याचं कारणं समजू शकलेलं नाही. गोळीबार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 15, 2020, 9:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या