• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Gold Smuggling: तब्बल 42 कोटी सोन्याची तस्करी; ही पद्धत पाहून पोलिसही हैराण

Gold Smuggling: तब्बल 42 कोटी सोन्याची तस्करी; ही पद्धत पाहून पोलिसही हैराण

ही पद्धत पाहून पोलिसही हैराण झाले.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेेंबर : Gold Smuggling: Directorate of Revenue Intelligence ने (DRI) तब्बल 42 कोटी रुपयांच्या किमतीचा 85.535 किलोग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. मशिनांच्या विविध भागांच्या रुपात तस्करी करून आणल्यानंतर हे सोन स्थानिक बाजारात विक्री करण्यापूर्वी वितळवलं जात होतं. डीआरआयने याबाबत माहिती दिली आहे. (Gold Smuggling) डीआरआयने सांगितलं की, दिल्लीच्या छतरपुर आणि हरयाणाच्या गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. यादरम्यान चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण कोरियाच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. तर चीन आणि तायवानचे एक-एक नागरिक आहेत. (Gold smuggling worth Rs 42 crore Seeing this method the police also got annoyed) तर दुसरीकडे छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात आज भोपळ्याच्या खाली लपवून 390 किलोग्रॅम गांज्याची तस्करी (Ganja Smuggling) करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गांज्याची किंमत 78 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोनवारी एका वाहनातून 390 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हे ही वाचा-रस्ते अपघातात जखमीला शवगृहातील फ्रीजरमध्ये ठेवलं;सकाळी पाहिल्यानंतर परिसरात खळबळ पोलिसांनी या प्रकरणात जय प्रसाद राजवाडे आणि अरविंद राजवाडे यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सरगुजा जिल्ह्याचे निवासी आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांना सोमवारी गांज्याच्या तस्करीबद्दल सूचना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी प्रत्येक वाहनाचा तपास सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान बटकी गावात पोलिसांनी एक पिकअप वाहनाला थांबवलं आणि वाहन चालकाची चौकशी केली.
  Published by:Meenal Gangurde
  First published: