जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बॉयफ्रेंडला पास करण्यासाठी प्रेयसीचा पराक्रम! पकडल्याने डिग्री अन् सरकारी नोकरीही जाणार?

बॉयफ्रेंडला पास करण्यासाठी प्रेयसीचा पराक्रम! पकडल्याने डिग्री अन् सरकारी नोकरीही जाणार?

बॉयफ्रेंडला पास करण्यासाठी प्रेयसीचा पराक्रम!

बॉयफ्रेंडला पास करण्यासाठी प्रेयसीचा पराक्रम!

Girlfriend Appears as Dummy Candidate for Boyfriend: गुजरातमधील एका विद्यापीठात शिकणारा मुलगा स्वतः सुट्टी एन्जॉय करत होता आणि त्याच्याऐवजी त्याची मैत्रीण, जी विद्यार्थीही नव्हती, पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये पोहोचली.

  • -MIN READ Surat,Gujarat
  • Last Updated :

सूरत, 26 डिसेंबर : प्रेमात माणूस काय करत नाही? केवळ प्रेमासाठीच मोठमोठी युद्धे लढली गेली आहेत. आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रेयसी किंवा प्रियकराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रेमाच्या उत्कटतेच्या अशा अनेक कथा तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील, पण नवीन काळातील प्रेमाची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. गुजरातमध्ये आपल्या बॉयफ्रेडला पास करण्यासाठी एक मुलगी चक्क त्याचा पेपर सोडवायला परीक्षा हॉलमध्ये पोहचली. या मागची संपूर्ण कहाणी खूपच रंजक आहे. गुजरातमधील सुरत येथील वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात शिकणारा हा विद्यार्थी स्वतः सुटी एन्जॉय करत होतो आणि त्याच्याऐवजी त्याची प्रेयसी, जी विद्यार्थीही नव्हती, पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये पोहोचली. अशी प्रकरणे तुम्ही ऐकलीच असतील, जिथे चांगले गुण मिळवण्यासाठी कोर्स पास झालेले लोक डमी उमेदवार म्हणून बसतात, पण ज्या मुलीने हा घोटाळा केला, ती सरकारी नोकरी करत होती. असे असूनही, त्याच्या प्रेमासाठी, तिने हा धोका पत्करला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. वाचा - बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारायला गेला तो परतलाच नाही; घटनेने खळबळ डोंगरात प्रियकर, परीक्षा हॉलमध्ये प्रेयसी परीक्षा ड्युटी दरम्यान, हॉलमधील निरीक्षक दररोज अनेकदा बदलतात, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराची ओळख पटवणे सोपे नाही. या दरम्यान ते फक्त रोल नंबर तपासतात. या वर्षी ऑक्टोबरमध्ये बी.कॉमच्या तिसर्‍या वर्षाची परीक्षा सुरू असताना ती मुलगी तिच्या प्रियकराच्या प्रवेशपत्रातील नाव आणि फोटो बदलून परीक्षेसाठी पोहोचली. मात्र, एकत्र परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाला सांगितले की, जिथे मुलगी बसली आहे, तिथे मागच्या पेपरला एक मुलगा परीक्षा देत होता. त्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि तरुणीला पकडण्यात आले. समितीने तपास पूर्ण केल्यानंतर शिक्षेची शिफारस विद्यापीठ व्यवस्थापनाकडे पाठवली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मुलीची नोकरीही जाऊ शकते… टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकरणात मुलीची पदवीही रद्द होऊ शकते आणि तिची नोकरीही जाऊ शकते. त्याच वेळी, मुलाला पुढील 3 वर्षे परीक्षा देण्यापासून रोखले जाऊ शकते. मुलाला समितीसमोर हजर केले असता प्रियकर उत्तराखंडला सुट्टी घालवण्यासाठी गेल्याचे सांगितले, तर मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. हा मुलगा नियमित परीक्षेत नापास झाला होता, त्यानंतर त्याच्या जागी त्याच्या मैत्रिणीने परीक्षा देण्याचे पाऊल उचलले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat , student
  • First Published :
जाहिरात
जाहिरात