मुंबई, 28 जानेवारी : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench of Bombay High Court ) आज एक मोठा निर्वाळा दिला आहे. एका बापाने आपल्या 17 वर्षीय मुलीला तांत्रिकाला ‘दान’ करण्याचं (Man Donates minor daughter to Priest) प्रकरण समोर आलं आहे. याला कडक विरोध करीत मुली काही कोणाची संपत्ती नाही, जी दान करता येईल; अशा शब्दात (HC says daughter is not a property to be donated) खडसावलं. तांत्रिक शंकेश्वर ढाकने आणि त्याचा शिष्य सोपान ढाकने याच्या जामीन याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती विभा कंकनवाडी यांच्या खंडपीठाने (Girl Is Not a Property) असं वक्तव्य केलं. अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
देवाच्यासाक्षीने केलं होतं, ‘कन्यादान’
न्यायमूर्ती कंकनवाडी यांनी सांगितलं की, 2018 मध्ये 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपवर मुलीच्या बापाने आणि ढाकने यांच्यादरम्यान एक प्रकारे दानपत्राचा करार करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, यात (स्टॅम्प पेपरवर) दिल्यानुसार या व्यक्तीने आपल्या मुलीचं दान एका तांत्रिक बाबाला केलं होतं आणि यात कन्यादान असा उल्लेख आहे. या स्टॅम्प पेपरमध्ये दिल्यानुसार, देवाच्या साक्षीने हे कन्यादान करण्यात आलं आहे. याला स्वत: मुलीच्या बापानेच परवानगी दिली आहे.
हे ही वाचा-आधी Rape, मग अश्लील व्हिडीओ; 3 मित्रांसोबत शेअर केल्यानंतर थरकाप उडवणारा प्रकार
कोर्टाने फटकारलं...
न्यायमूर्ती कंकनवाड़ी यांनी हे प्रकरण संतापजनक असल्याचं सांगितलं. मुलगी काही कोणती संपत्ती नाही, जी दान केली जाऊ शकते. न्यायालयाने पुढे सांगितलं की, ती मुलीच्या भविष्याबाबत चिंतेत आहे आणि डोळे बंद करून राहू शकत नाहीत. न्यायालयाने बाल कल्याण समितीला या बाबत तपास करण्यास सांगितलं आणि रिपोर्ट सादर करण्याचीही सूचना दिली आहे. दोघेही जालना जिल्ह्यातीन बदनापूर स्थित मंदिरात मुलगी आणि तिच्या वडिलांसोबत राहतात. मुलीने ऑगस्ट 2021 मध्ये दोघांविरोधात बलात्कारचा प्राथमिक गुन्हा दाखल केला होता. यानंतर शुक्रवारी न्यायालयाने 25-25 हजार रुपयाच्या जामिनावर दोघांना जामीन मंजूर करीत पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी असल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High Court, Mumbai, Small girl