जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / सोनमसाठी सना झाली 'सोहेल', लिंग बदलासाठी 12 लाख खर्च, पण शेवटी 'धोका'च झाला!

सोनमसाठी सना झाली 'सोहेल', लिंग बदलासाठी 12 लाख खर्च, पण शेवटी 'धोका'च झाला!

सोनमसाठी सना झाली 'सोहेल', लिंग बदलासाठी 12 लाख खर्च, पण शेवटी 'धोका'च झाला!

प्रेमात धोका झाल्याच्या अनेक घटना आपण जगभरात बघतो, पण नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेमुळे तुम्हीही चक्रावून जाल.

  • -MIN READ Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

झांसी, 21 जानेवारी : प्रेमात धोका झाल्याच्या अनेक घटना आपण जगभरात बघतो, पण नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेमुळे तुम्हीही चक्रावून जाल. दोन मुली एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या, आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाकाही त्यांनी घेतल्या, यानंतर एक मुलगी लिंग बदल करून मुलगा होते, पण नंतर तिच्या नशिबी धोकाच येतो. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये ही घटना घडली आहे. सना नावाच्या मुलीने तिची मैत्रिण सोनलसोबत लग्न करण्यासाठी 2020 साली लिंग बदल केलं. दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये मुलीने लिंग बदलाचं ऑपरेशन केलं आणि ब्रेस्टही काढून टाकली. सना खानने तिची ओळखही बदलली आणि सोहेल खान झाली. या ऑपरेशनसाठी तिने 12 लाख रुपये खर्च केले. सना आणि सोनल यांची प्रेम कहाणी 2016 साली सुरू झाली. दोघांच्या घरातले नाराज झाल्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. यानंतर 2017 साली दोन्ही कुटुंबांनी प्रकरण मिटवलं आणि दोघींना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याची परवानगी मिळाली. यानंतर 2020 साली सनाने लिंग बदलाचं ऑपरेशन केलं. या ऑपरेशननंतर दोघींचं लग्न होणार होतं, पण तेव्हाच या नात्यात नवा ट्विस्ट आला. सोनलचं मुलासोबत अफेयर सुरू झाल्याने या दोघींमध्ये वाद सुरू झाला. सोनलने सनाला लग्न करणार नसल्याचं सांगितलं, यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. सनाने सोनलविरोधात फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी सोनलला अटक केली. कोर्टाने सोनलला जामीन दिला, आता याची सुनावणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. सोनलच्या प्रेमापोटी आपण मुलीचा मुलगा झालो पण यानंतरही आपल्याला धोकाच मिळाला. जिच्यासाठी आपण हे सगळं केलं ती माझीच झाली पाहिजे, असं सोहेलला वाटतंय. सोनलला मात्र आता सोहेलसोबत राहायचं नाही, तसंच तिच्या घरचेही या लग्नाला तयार नाहीत, त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देणार? याकडे लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात