वैशाली, 12 सप्टेंबर : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. आरोपींना बलात्काराचा व्हिडिओही बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आपल्या प्रियकरासोबत एकटी बसलेल्या मुलीला चार जणांनी ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार केला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध अल्पवयीन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक प्रेमी युगूल बसलेले असताना याचवेळी याठिकाणी चार तरुण आले. यानंतर या तरुणांनी प्रियकराला ओलीस ठेवले. तसेच त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तेथून पोबारा केला. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जंदाहा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यात चार मुलांनी या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हे सर्व आरोपी एकाच गावातील असल्याचे सांगण्यात येत आहेत. आरोपींनी तिला ब्लॅकमेल केले यानंतर तिच्यासोबत दुष्कर्म केले. यावेळी ही मुलगी खूप घाबरुन गेली होती. आम्हाला सोडून द्या, अशी विनंतीही या मुलीने या तरुणांना केली होती. मात्र, या नराधमांनी तिचे काहीच ऐकले नाही. तसेच सर्व सीमा पार करत तिच्यासोबत दुष्कर्म केले. तसेच तिथून पोबारा केला. हेहे वाचा - मसाज करण्यासाठी आली होती महिला, तोंडात बोळा कोंबून केला बलात्कार; विरोध केला म्हणून… या प्रकरणी जंदाहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ राम यांनी फोनवर सांगितले की, चार जणांनी ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार केला, अशी लेखी तक्रार पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.