रूपेश कुमार भगत, प्रतिनिधी गुमला, 5 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडच्या गुमला येथे मानवतेला लाजवेल अशी ही घटना समोर आली आहे. शेजारच्या गावात असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटना परिसर हादरला आहे. बलात्काराच्या तीन आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत. एवढेच नाही तर तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला देण्यात आली. तर पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ही घटना गुमला जिल्ह्यातील बसिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. इथे एक अल्पवयीन मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली होती. त्याचवेळी दोन अल्पवयीन मुलांनी तिला पकडून 19 वर्षीय राहुलला बोलावले. त्यानंतर तिघांनी मिळून त्याच्यासोबत बलात्कार केला. यावेळी मुलगी दयेची याचना करत राहिली. मात्र, वासनेने अंध झालेल्या नराधमांनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिघांनी आलटून पालटून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तोंड उघडल्यावर जीवे मारण्याची धमकी तिला त्यांनी दिली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर मुलीने घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला पोलीस ठाण्यात नेले आणि लेखी अर्ज देऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. तीन आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. त्यामुळे अल्पवयीन तरुणांची रवानगी रिमांड होम आणि अन्य एका आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.