सय्यद कयम रजा, प्रतिनिधी पीलीभीत, 20 मे : उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. हा आरोप मुलाच्या आईने केला आहे. आरोपी पित्यानेच मुलासोबत गैरवर्तन केले असावे, अशी भीती मृत तरुणाच्या आईने पोलिसांसमोर व्यक्त केली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर घटनेपासून आरोपी वडील फरार आहे. ही घटना बिलसंडा परिसरातील बिचपुरी गावातील आहे. येथील रहिवासी सुनीता देवी ने आरोप केला आहे की, 15 मे रोजी पती सुभाष चंद्र याने तिला मारहाण करून मुलांसह घराबाहेर हाकलून दिले. जेव्हा पीडिता तिच्या माहेरी घरी मुलांसोबत राहू लागली तेव्हा आरोपी तिथे पोहोचला आणि तिथेही मारहाण करू लागला. दरम्यान, एके दिवशी त्याने मोठा मुलगा अभिषेकला सोबत आणले. पीडितेच्या आईचा आरोप आहे की, आधी आरोपी वडिलाने अभिषेकला गावाबाहेरील कालव्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभिषेक कसा तरी वडिलांच्या तावडीतून सुटला आणि घरी पळाला. मात्र, रात्री उशिरा आरोपी वडील सुभाष याने अभिषेकचा गळा आवळून खून केला. मृताच्या आईचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते आणि जखमांच्या खुणाही होत्या. पतीने मुलासोबत गैरवर्तन केल्याची भीती पीडितेने व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर याप्रकरणी कलमे वाढवली जातील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.