मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, तेलगीच्या सहकाऱ्याला सुनावली मोठी शिक्षा

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, तेलगीच्या सहकाऱ्याला सुनावली मोठी शिक्षा

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील शब्बीर शेखला मुंबई सत्र न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणात शिक्षा सुनावली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 3 डिसेंबर : राज्यासह संपूर्ण देशात गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तेलगीचा सहकारी शब्बीर शेखला मुंबई सत्र न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणात 5 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपरच्या छपाई आणि वितरित करण्याच्या आरोपात सहभागी असल्याचे सिद्ध झाल्याने आरोपीला शिक्षा सुनावल्यात आली आहे. हा निर्णय मुंबई सत्र न्यायालयातील विशेष अतिरिक्त न्यायाधीश सुनील यू हेक यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्या प्रकरणात 2009 मध्ये आरोपी शब्बीर शेख आणि तेलगीविरुद्ध वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी शब्बीर शेख दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि 16000 रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखीव ठेवण्यात आला होता. या संदर्भातील सविस्तर सहा पानाची ऑर्डर मुंबई सत्र न्यायालयातील वेबसाईटवर उपलब्ध करून घेण्यात आली आहे.

फिर्यादी खटल्यानुसार दोघांवर गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शब्बीर शेखने बनावट महसूल शिक्के तयार केले. शेख जो तेलगीचा जवळचा सहकारी होते. आरोपी शब्बीर शेख 2002 ऑक्टोबरपासून तुरुंगात होता तर या घोटाळ्यातील मास्टरमाईंड तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये तुरुंगात मृत्यू झाला होता. सध्याच्या प्रकरणात पोलिसांनी 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. परंतु, खटला सुनावणीसाठी प्रलंबित राहिला होता.

वाचा - 25 हजार देऊन आईनेच स्वत:च्या मुलाचा केला खून, धक्कादायक बाबसमोर

आरोपी शब्बीर शेखला 28 ऑक्टोबर 2002 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कोठडीत होता. तथापि सध्याचा गुन्हा 2009 मध्ये नोंदवण्यात आला होता. 12 सप्टेंबर 2014 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान शब्बीरला अटक करण्यात आली नसल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते असे सत्र न्यायालयाने नमूद केले आहे. जेव्हा खटला आरोप निश्चित करण्यासाठी नियोजित होता. तेव्हा आरोपी शब्बीर शेखने सांगितले की तो गेली 20 वर्षे तुरुंगात आहे, त्याची पत्नी आणि मुलाच्या सहवासापासून वंचित आहे. त्यांनी न्यायालयाला नम्रतेचे आवाहनही केले होते.

फिर्यादीच्या खटल्यानुसार तेलगीने नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून भंगारात विकली जाणारी प्रिंटिंग मशिनरी खरेदी केली होती. बनावट स्टॅम्प पेपर छापले होते. ते 1993 ते 2002 दरम्यान सवलतीच्या दरात विकले होते.

2001 मध्ये तेलगीच्या अटकेनंतर शेकडो कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाला. त्यानंतरच्या तपासात त्याचे अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे देखील नाव तेलगी सोबत त्यावेळी जोडले गेले होते. महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये तेलगीवर सुमारे 40 गुन्हे दाखल आहे.

First published:

Tags: Crime, Telgi stamp scam