• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 393 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा

393 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा

या घोटाळ्यात संबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे साहिल जैनच्या नातेवाईकांच्या घरात लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने शनिवारी तपास अभियान सुरू केले होते.

 • Share this:
  लुधियाना (सेठी), 21 जून : जीएसटी आर्थिक घोटाळा (GST fraud cases) प्रकरणी साहिल जैनच्या नातेवाईकाच्या घरावर लुधियानाच्या सीजीएसटी आयुक्तालयाच्या अॅंटी इव्हॅजन विंगने छापा टाकला. साहिल जैनच्या (sahil jain gst fraud case) नावावर असलेल्या 393 कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणूक प्रकरणी तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. येथून जवळपास 40 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. जीएसटी फसवणूक प्रकरणातील मोठे नाव असलेल्या साहिल जैनला 11 नोव्हेंबर 2020 मध्ये 393 कोटी रुपयांचे बनावट बिलिंग रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यात संबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे साहिल जैनच्या नातेवाईकांच्या घरात लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने शनिवारी तपास अभियान सुरू केले होते. साहिल जैनचे दूरच्या नात्यातील एका योगेश जैन यांच्या घरी ही कारवाई झाली असून घरामध्ये शोधाशोध सुरू असताना एका बेडरूममधील कपाटातून जवळजवळ 40 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान योगेश यांनीही जीएसटी चोरीमध्ये सहभागी असल्याचे कबूल केले. योग्यप्रकारे चालन जारी न करता विविध वस्तू मिळविण्यासाठी कच्चे बिल तयार करून जीएसटीची चोरी केली जात असल्याचे त्याने सांगितले. हे वाचा - 7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी सूत्रांच्या माहितीनुसार, जीएसटी चोरी प्रकरणातील किंग पिन साहिल जैन सध्या फरार आहे. विभागाचे अधिकारी त्याच्या नातेवाइकांच्या मागावर आहेत यादरम्यानच योगेश जैनने केलेल्या जीएसटी चोरीचाही खुलासा झाला. साहिल न्यायालयात खोटी सिक्युरिटी देऊन जामीन मिळवण्यात यशस्वी झाला होता. त्याचा शोध सध्या सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published: