मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नानंतर झाली 3 मुलं, अन् नंतर दुसऱ्यावर आला जीव, सर्वांना सोडून निघाली महिला...

लग्नानंतर झाली 3 मुलं, अन् नंतर दुसऱ्यावर आला जीव, सर्वांना सोडून निघाली महिला...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Moradabad, India

पीयूष शर्मा, प्रतिनिधी

रामपूर, 25 मे : असे म्हणतात की या जगात आई आणि मुलाचे खूप पवित्र आणि अतूट नाते आहे. आपल्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आई आपला जीव पणाला लावते. यासोबतच आई आणि मुलाच्या नात्याला या जगात सर्वात मोठा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, याच्या अगदी उलट प्रकरण उत्तरप्रदेशच्या रामपूरच्या शाहाबाद शहरातील एका परिसरातून समोर आले आहे.

येथे तीन मुलांच्या आईचा एका व्यक्तीवर इतका जीव जडला की, तिने कुटुंब सोडून प्रियकराकडे जाण्याचा हट्ट धरला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले, तिथेही मुले आईला सोबत घेऊन जाण्याची विनंती करत होते.

शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या एक विवाहित महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि ती सर्व मर्यादा ओलांडत तिच्या प्रियकरासोबत पळून जात होती. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी तिचा प्रियकर आणि महिलेला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर महिलेच्या सासरच्या लोकांनीही पोलीस ठाणे गाठले.

सासरचे लोक आणि पोलीस महिलेला समजावून सांगत होते. मात्र, त्यानंतरही महिला कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. ती महिला तिच्या प्रियकरसोबत जाण्यावर ठाम होती. प्रियकर आणि प्रेयसीमधील या वादात मुलेही घटनास्थळी पोहोचली आणि आईला सोबत जाण्याची विनंती करताना मुलेही रडू लागली. मात्र, मुलांना पाहूनही या महिलेचा निर्णय बदलला नाही. महिला कोणाचेही ऐकायला तयार नव्हती.

बऱ्याच वेळानंतर उच्चभ्रू लोकांकडून महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता. नंतर उच्चभ्रू लोकांनी त्या महिलेला पोलीस स्टेशनपासून दूर नेले. मात्र, ती महिला प्रियकरासोबत जाण्यावर ठाम होती. दरम्यान, या प्रकरणाची माहिती ऐकून सर्व जण आश्चर्यचकित झाले. आता ही बातमी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

First published:
top videos

    Tags: Local18, Physical Relationship, Uttar pradesh, Women extramarital affair