मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यामध्ये हे चाललंय काय? पोलीस अधिकाऱ्याला 25 लाखांचा गंडा, RTI कार्यकर्त्यासह 7 जणांवर गुन्हा

पुण्यामध्ये हे चाललंय काय? पोलीस अधिकाऱ्याला 25 लाखांचा गंडा, RTI कार्यकर्त्यासह 7 जणांवर गुन्हा

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका पोलीस उपनिरीक्षकांकडून तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट याच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (rti activist arrested pune) पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे असे फिर्यादीचे नाव आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

पुणे, 22 एप्रिल : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका पोलीस उपनिरीक्षकांकडून तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी (extortion case in Pune) घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट याच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (RTI activist arrested pune) पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

दिनशे समुद्र आणि इतरांनी केलेल्या 12 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा फिर्यादी यांच्याकडे तपासासाठी होता. ते दीर्घ काळ येरवडा कारागृहात होते. सुधीर आल्हाट याने वकील देऊन त्याला जामीन मिळवून दिला. समुद्र याच्या गुन्ह्यात मदत न केल्याने आल्हाट याने सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांना धमकाविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, आल्हाट याने अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार खोट्या तक्रारी केल्याने सोनवणे यांना निलंबित करण्यात आले.

हे वाचा - राणा दाम्पत्याचा गनिमी कावा? शिवसैनिक रोखणार असल्याचं कळताच पहाटेच मुंबईत दाखल?

धमकीही दिली

आरोपी सुधीर आल्हाटने आतापर्यंत 32 अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला बडतर्फ करण्याची ऑर्डर लवकरच निघणार असल्याची धमकी दिली. यानंतर सोनवणे घाबरले आणि त्यांनी आणखी एका पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पालवेसोबत आल्हाट याची भेट घेतली. त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी अर्चना समुद्र आणि रोहन समुद्र यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर 25 लाखावर तडजोड केली. 7 नोव्हेबर 2021 त्यांनी आरोपींना 25 लाख रुपये दिले.

याप्रकरणी सुधीर आल्हाट (रा. रामांचल बिल्डिंग, शिवाजीनगर), अर्चना समुद्र, रोहन समुद्र, दिनेश समुद्र (तिघे रा. कोथरुड), जितु भाऊ, आण्णा जेऊर आणि मनिषा धारणे (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एका महिलेच्या तक्रारीवरुन सुधीर आल्हाट आणि इतरांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सोनवणे यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Pune police, RTI