अहमदाबाद: शहरातील अहमदाबाद भागात एका महिलेच्या हत्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पहिल्या पतीने आपल्या मित्रांसह तिच्याच घराजवळ महिलेवर चाकूने हल्ला केला आणि पळ काढला. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.
अहमदाबादमधील वटवा भागात (Ahmedabad news) या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, येथील तरुणीच्या पहिल्या पतीने तिची हत्या केली. सुख सागर सोसायटीमध्ये राहणारी हेमा मराठी नावाच्या महिलेला तिचा पहिला पती अजय ठाकूर याने तब्बल 20 वेळा चाकू घुपसून हत्या केली. या प्रकरणात तरुणीचा पती महेश ठाकोर याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मराठी हिचं लग्न पहिल्यांदा थारा गावातील निवासी अजय ठाकूर याच्यासोबत झालं होतं. दीड वर्षांपूर्वी तिचं महेश ठाकूर या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. यानंतर तिने पती अजय ठाकूर याच्यासोबत घटस्फोट घेतला आणि आपल्या दोन मुलांसह चोटिला मंदिरात लग्न करून दुसऱ्या पतीसोबत राहू लागली.
बुधवारी रात्री हेमाचा पहिला पती अजय ठाकूर आणि भावेश व एक अन्य व्यक्तीसह हेमाच्या घरी गेले होते. येथेच त्यांनी तिची चाकू मारून हत्या केली. शेजारच्यांनी या घटनेची माहिती हेमाच्या दुसऱ्या पतीला दिली.
यानंतर महेश ठाकेर यांने पोलीस ठाण्यात तरुणासह चार जणांविरोधात हत्याची तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इको कारमधून हे मारेकरी हेमाच्या घरी आले होते.
पोलिसांनी हेमाच्या पहिल्या पतीला अटक केली असून त्याच्या अन्य दोन मित्रांची अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.