मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सूनेच्या मृतदेहाच्या तुकड्यांचे सूप पीत होते सासू-सासरे, श्रद्धासारखं भीषण हत्याकांड

सूनेच्या मृतदेहाच्या तुकड्यांचे सूप पीत होते सासू-सासरे, श्रद्धासारखं भीषण हत्याकांड

बायकोसोबत धक्कादायक कृत्य

बायकोसोबत धक्कादायक कृत्य

माजी पतीने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले.

हाँगकाँग, 27 फेब्रुवारी : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर याचप्रकारची घटना हाँगकाँगमधून उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय एबी 22 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. 24 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी घराची झडती घेतली. यावेळी फ्रिजमध्ये तिचे कापलेले पाय सापडले.

सुरुवातीला घरातील अवस्था पाहून असे वाटले की, याठिकाणी काहीतरी गंभीर गोष्ट करण्याची तयारी सुरू होती. अॅबीच्या माजी पतीने तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. पोलिसांना घराच्या रेफ्रिजरेटरमधून अॅबीचे कापलेले पाय सापडले आहेत. याप्रकरणी अॅबीच्या माजी पतीला 25 फेब्रुवारीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर शरीराच्या उर्वरित अवयवांचा शोध सुरू आहे.

100 दशलक्ष हाँगकाँग डॉलर्स (£10.7m) किमतीच्या मालमत्तेवरून अॅबीचा तिचा माजी पती आणि त्याच्या सासरच्या कुटुंबासोबत आर्थिक वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही मालमत्ता एबीने नुकतीच विकण्याची योजना आखली होती. एबी चोई हाँगकाँगची प्रसिद्ध मॉडेल होती. एबीचे इंस्टाग्रामवर 90000 फॉलोअर्स आहेत. गेल्या महिन्यात अॅबी L'Offical Monaco मासिकाच्या कव्हर पेजवर दिसली होती. घरात दोन सूपचे कप मिळाले आहेत, यामध्ये मानवीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहे, असे सांगितले जात आहे.

रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्...

दरम्यान, प्रसिद्ध मॉडेल एबी चोईच्या माजी पतीने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिसांना घराच्या रेफ्रिजरेटरमधून एबीचे कापलेले पाय सापडले आहेत. याप्रकरणी तिचा माजी पती एलेक्स क्वांग याला 25 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी एबीचे माजी सासरे, सासू आणि तिच्या पतीच्या लहान भावाला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, International, Murder Mystery, Murder news