अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 11 जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका भावाने 200 रुपयांसाठी मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. फक्त 200 रुपये मजुरी वाटल्याबद्दल धाकट्या भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर गावात खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला भावाला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण घटना - ही घटना कानपूरच्या जोरावर पुर गांवातील आहे. याठिकाणी आर्थिक व्यवहारातून लहान भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची हत्या केली. गावातील रहिवासी श्याम बाबू कश्यप यांचे आजाराने निधन झाले आहे. तसेच त्यांची पत्नी संतोषी देवी, मुलगा बाबू कश्यप, विशाल आणि तीन मुलींसह गावात राहतात. रविवारी विशाल आणि बाबू हे कुटुंबीयांसह भात रोवणीसाठी गावी गेले होते. मजुरी मिळण्यावरून दोघांमध्ये 200 रुपयांवरून वाद झाला.
त्यानंतर लहान भाऊ विशालने त्याचा मोठा भाऊ बाबूच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर विटेने वार केला, यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हत्येत वापरलेल्या वीट आणि स्कार्फसह पोलिसांनी मारेकरी विशाल कश्यप याला अटक केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबाबत एडीसीपी पश्चिम यांनी सांगितले की, चौबेपूर पोलीस ठाण्यात दोन भावांमध्ये किरकोळ व्यवहारावरून वाद झाला, त्यात लहान भावाने मोठ्या भावाचा अनेक विटांनी वार करून गळा दाबून खून केला. आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.