Home /News /crime /

भयंकर! Heart Attack आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

भयंकर! Heart Attack आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

भयावह घटना, 40 वर्षीय डॉक्टरच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे रुग्णालयात शोककळा पसरली आहे.

    हैद्राबाद, 29 नोव्हेंबर : हैद्राबादमधील (hyderabad News) एका रुग्णालयात हार्ट पेशंटवर उपचार करीत असताना एका डॉक्टरला हृदयविकाराचा ( heart attack) झटका आल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. यात डॉक्टरचा रुग्णालयातच मृत्यू झाला. ज्या रुग्णावर डॉक्टर उपचार करीत होते, त्याचाही काही वेळानंतर मृत्यू झाला. डॉक्टरचं वय अवघे 40 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. हैद्राबादमधील गुजाला भागात राहणारा 60 वर्षीय जगिया नाईक यांना रविवारी सकाळी हार्ट अटॅक आला होता. त्यांना उपचारासाठी गांभारी मंडलच्या एसवी श्रीजी नर्सिंग होम येथे आणण्यात आलं. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये डॉ. लक्ष्मण त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पोहोचले. डॉ. लक्ष्मण रुग्णावर उपचार करीत होते, तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. (Doctor dies of a heart attack while treating a patient with a heart attack) हे ही वाचा-कोयत्याने बुलेट फोडून पेटवली, कबुतरांना जिंवत जाळलं, गुंडांचा हैदास, VIDEO उपचार न मिळाल्याने रुग्णानेही सोडला जीव हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉ. लक्ष्मण यांना सहकाऱ्यांना आपात्कालीन उपचार दिले. मात्र त्यांना वाचवता आलं नाही. यानंतर रुग्णालयातील कर्मचारी त्यांचा मृतदेह आयसीयूच्या बाहेर घेऊन आले. यादरम्यान उपचार घेत असलेले नाईक यांची प्रकृती बिघडली. रुग्णाचे कुटुंबीय त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र दुसऱ्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. भोपाळमध्ये डान्स करीत असताना डॉक्टरला हृदयविकाराचा झटका एक महिन्यापूर्वी भोपाळमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. येथे एका पार्टीमध्ये डान्स करणारे 67 वर्षीय सीनियर डॉक्टर सीएस जैन यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते खाली कोसळले. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला होता. त्यावेळी हॉटेलमध्ये 50 डॉक्टर उपस्थित होते. यावेळी शहरातील टॉप लेव्हलचे एक्सपर्टदेखील होते. मात्र जैन यांना वाचवता आलं नाही.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Heart Attack

    पुढील बातम्या