जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला....

डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला....

डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला....

डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी स्टाफला मेसेज केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 13 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) इटावाच्या पंजाबी कॉलोनीमध्ये एका डेंटल डॉक्टरने आत्महत्या (Doctor Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. इटावाचे एसपी सिटी कपिल देव सिंहने सांगितलं की, डेंटल डॉक्टर सिद्धार्थ राहुलच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी क्लीनिकशी संबंधित लोकांविरोधात प्रार्थना पत्र दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर सिद्धार्थ राहुलचे वडील आणि भावाने क्लीनिकच्या स्टाफविरोधात सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय मृत व्यक्तीचा आपल्या पत्नीसोबत गेल्या 6 वर्षांपासून वाद सुरू होता. इतक्या वर्षात त्याने कधीच असं पाऊल उचललं नाही. मात्र एकाएकी त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. आत्महत्येपूर्वी स्टाफ मेंबर्सना केला मेसेज डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्टाफचा सदस्य दीपकला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला होता. डॉक्टरांनी लिहिलं होतं की, आता मी जग सोडून निघून जाईन…यानंतर स्टाफ तातडीने त्यांच्या घरी पोहोचला. घराचं टाळं तोडून आता शिरला तर डॉक्टर गळफास घेतला होता. मृत डॉक्टर सिद्धार्थ राहुल यांचं वय 38 वर्षे होतं. घराच्या खालीच त्यांचं क्लीनिक होतं. त्यांच्या क्लीनिकमध्ये 7 जणं काम करतात. सहा वर्षांपासून डॉक्टरची पत्नी आपल्या माहेरी… दाम्पत्याच्या नात्यातील तणाव वाढल्यानंतर डॉक्टरची पत्नी आपल्या माहेरी निघून गेली होती. गेल्या सहा वर्षांपासून ती माहेरीच राहते. त्यांना सात वर्षांचा मुलगाही आहे. सध्या डॉक्टर आणि त्याच्या पत्नीमध्ये पोटगीच्या दाव्यावरुन न्यायालयात केस सुरू आहे. यामुळे मृत व्यक्ती तणावात होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात