धुळे, 31 मार्च : निवृत्तीच्या दिवशी एका सरकारी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक (ACB arrest BDO while taking bribe) केली आहे. शिरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यासह (Shirpur Panchayat Samiti BDO) सहाय्यक लेखाधिकार्यास पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. विशेष म्हणजे गटविकास अधिकार्याचा गुरुवारी कामाचा शेवटचा दिवस होता. निवृत्तीच्या दिवशीच गटविकास अधिकार्यावर अॅन्टी करप्शनची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सेवा निवृत्ती सोहळ्याची तयारी सुरू असतानाच, शिरपूर पंचायत समितीच्या बीडिओला पाच हजार रुपयांची लाच घेतांना ACB ने रंगेहात अटक करण्यात आली आहे. तक्रारदार हा शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराचे भविष्य निवार्ह निधीचे पैसे मिळवून देण्यासाठी शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज दलाल शिंदे (BDO Yuvraj Shinde) याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. वाचा : खळबळजनक! अवैध वाळू उपसा करण्यास रोखलं, वाळू माफियांनी तरुणाची केली निर्घृण हत्या लाचेचे हे पैसे सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल गोपीचंद देवरे यांच्या हस्ते घेण्याचे ठरले होते. त्याआधीच तक्रारदाराने धुळे लाचलूपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथकाने शिरपूर पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. यावेळी तक्रादार यांच्याकडून गटविकास अधिकारी युवराज शिंदेंच्या सांगण्यावरुन सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल देवरेने लाचेचे पाच हजार रुपये घेतले. त्याचवेळी धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली. गटविकास अधिकारी शिंदे हे गुरुवारी निवृत्त होणार होते. त्याआधीच त्यांच्यावर ही कारवाई झाली. वाचा : भरधाव SUVची पादचाऱ्याला जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा VIDEO आला समोर युवराज शिंदे यांचा निवृत्तीच्या दोन तास आधी एसीबीने लाच घेताना त्याला अटक केल्याने प्रशासकीय यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिंदेच्या निवृत्ती सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका देखील छापण्यात आलेली होती. भव्यदिव्य निवृत्ती सोहळा संपन्न होणार असल्याची चर्चा पंचायत समिती कार्यलयात रंगलेली असतांना मात्र निवृत्ती च्या दोन तास आधीच शिंदेला लाचेचा मोह आवरता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.