जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जावयानं या गोष्टीचा राग धरत सासरच्यांना दिलं विष, मासळीतून केलं अख्ख्या कुटुंबावर स्लो पॉयझनिंग

जावयानं या गोष्टीचा राग धरत सासरच्यांना दिलं विष, मासळीतून केलं अख्ख्या कुटुंबावर स्लो पॉयझनिंग

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

Crime News: जावयाला सासरी खूप मान दिला जातो. या जावयानं मात्र धक्कादायक कृत्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 मार्च : दिल्लीमध्ये थॅलियम हे विष देऊन एका कुटुंबातील दोन लोकांची हत्या करण्यात आली. कुटुंबातील इतर दोन लोकही जीवनमरणाच्या दरम्यान संघर्ष करत आहेत. शिवाय एका घरकाम करणाऱ्या महिलेचीही अवस्था गंभीर आहे. (Delhi news) या प्रकरणात कुटुंबातील जावयाला अटक केली गेली आहे. आरोपीची सासू आणि मेहुणीचा मृत्यू झाला आहे. पत्नी आणि सासऱ्याची अवस्था गंभीर आहे. दिल्लीमध्ये अशाप्रकारे सगळ्या कुटुंबाला थॅलियम देऊन मारण्याचा प्रयत्न असलेला पहिलाच प्रकार समोर आला आहे. (slow poisoning thallium case) पोलिसांचं म्हणणं आहे, की थॅलियम हे एक असं स्लो पॉइझन आहे, की जे माणसाला हळूहळू मारतं. यामुळं माणसाचे केस गळू लागतात. शरीरात विविध त्रास निर्माण होऊ लागतात. शेवटी माणसाचा मृत्यू होतो. ही घटना पश्चिम दिल्लीच्या इंद्रपुरी ठाण्याच्या भागातील आहे. पश्चिम दिल्ली पोलिसांनी सांगितलं, की अटक झालेल्या आरोपीचं नाव वरुण अरोरा आहे. त्याच्या ग्रेटर कैलास पार्ट - 1 इथल्या घरात एका ग्लासात थोडं थॅलियम मिळालं आहे.  (son in law poisons wife and family) हेही वाचा नवरा-बायकोच्या भांडणाने गाठलं टोक; स्वत:ला पेटवून नवऱ्याला मारली मिठी शिवाय त्याचा मोबाईल फोनमधूनही पोलिसांना या रसायनाबाबत काही एमाहिती मिळते आहे. सांगितलं जातं आहे, की सासरवाडीत याचा काही कारणांवरून अपमान झाला होता. याचा सूड उगवण्यासाठी यावर्षी जानेवारीत त्यानं आपल्या सासरवाडीत पत्नीसह सगळ्यांना मासळीच्या माध्यमातून थॅलियम हे विष दिलं. (son in law poisons wife and family through fish) यानंतर हळूहळू कुटुंबातील लोकांचे केस गळू लागले. 22 मार्चला गंगाराम हॉस्पिटलमधून इंद्रपुरी पोलीस स्टेशनला याबाबत फोन गेला होता. सांगितलं गेलं होतं, की इंद्रपुरी भागात राहणाऱ्या अनिता देवी नावाच्या एका महिलेला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं. डॉक्टरांनी पोलिसांना आपल्या निरीक्षणांमध्ये सांगितलं, की महिलेच्या रक्त आणि लघवीची तपासणी केल्यावर यात थॅलियम नावाचं विष मिळालं. यामुळं मृत्यूही होऊ शकतो. (delhi son in law uses thallium for poisoning) हेही वाचा Mansukh Hiren Deth case: फेक कॉल, मास्क आणि रुमाल, ‘त्या’ रात्री काय घडलं? हे प्रकरण असं रहस्यमय झाल्यावर पोलिसांनी तपास आपल्याकडे घेतला. इंद्रपुरीचे एसएचओ सुरेंद्र सिंह, नारायणा ठाण्याचे इन्स्पेक्टर प्रमोद आणि मायापुरी सब डिव्हिजनचे एसीपी विजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास पुढे जाऊ लागला. यादरम्यान पोलिसांना कळालं, की जीके पार्ट - 1 मध्ये राहणाऱ्या एका महिलेला सर गंगाराम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भरती केलं गेलं आहे. तिचीही हिस्ट्री थॅलियम याच विषाची येते आहे. ती व्हेंटिलेटरवर आहे. दिव्या ही आरोपी वरुणची पत्नी आहे. चौकशीत पोलिसांना कळालं, की मृत अनिताच्या लहान मुलीचाही बीएल कपूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यातही थॅलियम पॉइझनची लक्षणं होती. तपासात देवेन्द्र मोहन शर्मा यांच्यातही अशीच लक्षणं असल्याचं समोर आलं. प्रकरण खूप गंभीर होत असल्याचं पाहून पोलीस याच्या मुळापर्यंत गेले. कळालं, की अनिताकडे काम करणारी मोलकरीणही अशाच लक्षणांशी झुंजते आहे. तिचे उपचार सध्या आरएमएलमध्ये सुरू आहेत. आता पोलिसांना समजलं, की हे प्रकरण सगळ्या कुटुंबाला विष देऊन मारण्याचं आहे. यात मृतदेहाचं शवविच्छेदन आरएमएल हॉस्पिटलच्या शवागारात केलं गेलं. सिनियर डॉक्टर्सनी सविस्तर ऑटोप्सी रिपोर्ट दिला. तपासादरम्यान जावई वरुणवरचा संशय बळावला. माहीत झालं, की त्यानं जानेवारीमध्ये सासरवाडीत आल्यावर सगळ्यांना मासळी खाऊ घातली होती. मासळी आणि अन्य गोष्टींमध्ये त्यानं थॅलियम मिसळून कुटुंबाला खाऊ घातलं होतं. यानंतर कुटुंबाची अवस्था खालावत गेली. वारुणला पकडून पोलिसांनी कडक शब्दात चौकशी केली. त्यानं सगळं सत्य कथन केलं. त्यानं सांगितलं, की सासरवाडीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं हे केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: wife
  • First Published :
जाहिरात
जाहिरात