नवी दिल्ली, 30 मे : उत्तर-पश्चिम दिल्लीच्या शाहबाद डेयरी भागात प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रियकराने मुलीवर चाकूने सपासप वार केले, तसंच तिच्या डोक्यातही दगड घातला. या घटनेचं भयावह सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. यानंतर आता आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये 20 वर्षांचा साहिल हल्ला करण्याच्या काही क्षण आधी पीडित मुलीची वाट पाहताना दिसत आहे. साहिलने 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 20 पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. यानंतर सिमेंटच्या सळ्यांनीही तिच्यावर हल्ला केला, ज्यात तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या शरिरावर दुखापतीच्या 34 खुणा दिसल्याचं निष्पन्न झालं, तसंच तिची खोपडीही फुटली होती. नव्या सीसीटीव्हीमध्ये साहिल एका व्यक्तीशी बोलत असल्याचं दिसत आहे. यानंतर त्याने मुलीची हत्या केली. या व्यक्तीशी बातचित केल्यानंतर ती व्यक्ती तिथून निघून गेल्याचंही दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल तिकडे मुलीची वाट पाहत उभा होता. मुलीने काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. तसंच हत्येच्या एक दिवशी आधीही दोघांमध्ये वाद झाला होता.
#WATCH | Delhi | CCTV visuals show accused Sahil in the Shahbad Dairy area, before he murdered the 16-year-old girl, on 28th May.
— ANI (@ANI) May 30, 2023
(Video: CCTV visuals confirmed by Police) pic.twitter.com/VAmr0EikXu
2021 पासून मुलगी साहिलच्या संपर्कात होती, पण दोघांमधले संबंध तणावपूर्ण झाले होते. त्या दोघांमध्ये कायमच भांडणं व्हायची, अखेर मुलीने साहिलसोबत संपर्क तोडण्याचा आणि नातं संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतरही साहिलला तिच्यासोबतचे वाद मिटवायचे होते. मुलीच्या हातावर प्रविणचा टॅटू याशिवाय पोलीस पीडित मुलीच्या हातावरच्या टॅटूचीही चौकशी करत आहे. या मुलीच्या हातावर प्रविण या नावाचा टॅटू आहे. हा प्रविण कोण आणि त्याच्या या घटनेशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. लोकांची बघ्याची भूमिका या अल्पवयीन मुलीवर हल्ला होत असताना तिकडे उपस्थित असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. यातला एकही जण मुलीला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. तसंच पोलिसांना याबाबत माहिती मिळायला 25 मिनिटं उशीर झाला. तिकडे उपस्थित असलेल्या एकानेही पीसीआर (पोलीस नियंत्रण कक्ष) सोबत संपर्क केला नाही.

)







