मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /डी गँग पुन्हा सक्रीय? गुंड जावेद चिकना याच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक

डी गँग पुन्हा सक्रीय? गुंड जावेद चिकना याच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक

डी गँग पुन्हा सक्रीय?

डी गँग पुन्हा सक्रीय?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीय गुंड जावेद चिकना याच्या नावाने मुंबईतील एका व्यापाऱ्याला धमकी आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

विजय वंजारा, प्रतिनिधी

मुंबई, 23 मार्च : 1993 च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी जावेद चिकना याच्या नावाने फोनवरून धमकी दिल्याबद्दल खंडणी विरोधी पथकने (AEC) एका व्यक्तीस अटक केली आहे. 2016 मध्ये, आरोपी याकीर सज्जाद हुसेन (60) याने तक्रारदाराकडे 1.5 कोटी रुपयांची मागणी केली, ज्याने त्याच्यासोबत व्यवसाय करण्यास नकार दिला होता. अंधेरीचा रहिवासी असलेल्या हुसेनने नुकसान झाल्याचे सांगत तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

खंडणी विरोधी पथकने म्हटले आहे की तक्रारदार कुवेतमध्ये आपला व्यवसाय चालवतात आणि हुसेनने त्याला आपला भागीदार होण्याची ऑफर दिली होती. हुसेनच्या कथित बेकायदेशीर कृत्याबद्दल कळल्यानंतर पीडित व्यक्तीने नकार दिला. ज्यासाठी 2017 मध्ये त्याला धमकी देण्यात आली होती. त्यानंतर फिर्यादीने ठाणे पोलिसांकडे धाव घेतली होती.

वाचा - धक्कादायक! ..अन् पोलिसांनीच लंपास केले महिलेचे लाखोंचे दागिने; काय आहे प्रकरण?

नंतर 17 सप्टेंबर 2022 रोजी फिर्यादीला दुबईत राहणाऱ्या जावेद चिकना यांच्या सहकाऱ्याचा पुन्हा फोन आला. फोन करणार्‍याने हुसेनचे नुकसान झाल्याचा आरोप केला आणि दीड कोटी रुपयांची मागणी केली. 26 सप्टेंबर रोजी तक्रारदार भारतात परतला. त्यावेळी त्याने पुन्हा मुंबई आणि गुन्हे शाखेशी संपर्क साधला. चिकना हुसेनच्या संपर्कात आहे का? याचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी तक्रारदाराला धमकावण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सिमकार्डचा वापर केला आहे. याचाही आता तपास केला जात आहे.

कोण आहे जावेद चिकना?

जावेद चिकनाही दाऊदप्रमाणेच पाकिस्तानात राहतो. चिकनाने टायगर मेमनसोबत 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. तो हवाला व्यवसायाशी संबंधित आहे. सहा वर्षांपूर्वी चिकना पाकिस्तानमध्ये रेस्टॉरंट चालवत असल्याची बातमी आली होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशीही त्याचे संबंध आहेत. जावेद चिकना हा टायगर मेमनचा खास माणूस होता. तो दिसायला गोरागोमटा आणि देखणा होता. नेहमी गुळगुळीत दाढी केलेली असायची. म्हणूनच त्याला चिकना हे नाव पडलं. तो मेमनसाठी सोन्याची तस्करी करायचा. दाऊदने मुंबई बॉम्बस्फोटाची योजना आखली तेव्हा त्याने टायगर मेमनला विश्वसनीय लोकांची निवड करण्याची जबाबदारी दिली होती. जावेद चिकना हाही त्यातलाच एक होता. मेमनने चिकनाला दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवले आणि तिथे त्याने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.

First published:
top videos

    Tags: Gangster