जर कोणी तुम्हाला डेटिंग आणि सेक्सच्या माध्यमातून (डेटिंग, भेट आणि सेक्स) पैसे कमावण्याचं आमिष दाखवत असेल तर सावधान व्हा. हे प्रलोभन तुम्हाला भारी पडू शकतात. अहमदाबादच्या सायबर क्राइमने अशाच बटी-बललीला अटक केली आहे. या दोघांवर सेक्सचं आणि पैशांचं आमिष दाखविण्याचा आरोप आहे.
अहमदाबादच्या साइबर क्राइमने आकाश लालवानी आणि जेमिका पटेल यांना बडोद्याहून अटक केली आहे. या आरोपींनी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून एका तरुणाशी मैत्री केली. आणि ते स्वत:ची एस्कॉर्ट कंपनीही चालवितात.
याच्या माध्यमातून ते डेटिंग, भेट आणि तरुणीसोहत सेक्स करीत शारिरीक समाधान मिळवून दिलं जाईल, यासाठी ते तरुणांकडून पैसे आकारत होते. याची सुरुवात 500 रुपयांपासून सुरू होते. या प्रकरणात एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आणि तरुणीला भेटणे आणि इतर कारणांच्या बहाण्याने शेवटी त्या तरुणाकडून 7 लाख 10 हजार रुपये आकारण्यात आले. यानंतर तरुणाने या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार केली.
यानंतर आरोपीकडून मोबाइल जप्त करून याचा तपास करण्यात आला. हे दोघांनी एका दुसऱ्याच तरुणीच्या नावावर फेक फेसबुक अकाऊंट सुरू केलं होतं. या अकाऊंटवरुन ते तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवित होते. आणि त्यांना फसवत होते.
पोलिसांनी आरोपींकडून विविध बँकांची खाती, मोबाइल फोन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि अन्य पासबुक जप्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे त्यांनी अनेकांना फसविल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.