नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : देशभरातील नामांकित रुग्णालय म्हणून ओळख असलेलं याशिवाय राजकीय नेत्यांपासून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्या रुग्णालयात उपचार घेतात. त्या रुग्णालयातील भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे. हे प्रकरण नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयातील राजेंद्र प्रसाद आय सेंटर (RP सेंटर) मधील आहे. प्राथमिक तपासानंतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय हे प्रकरण इकोनॉमिक ऑफेंस विंगला रेफर करण्यात आलं आहे. या शिवाय या प्रकरणात एफआयआरदेखील दाखल करण्यात आलं आहे. एम्सकडून याची पुष्टी केली असली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यापूर्वी एम्स ट्रॉमा सेंटरमधून भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरण समोर आलं होतं. आरपी सेंटरच्या जनरल स्टोअरशी संबंधित प्रकरण मिळालेल्या माहितीनुसार, आरपी सेंटरच्या जनरल स्टोअरशी संबंधित हे प्रकरण आहे. मेडिकल वस्तुंच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत विभागाने ऑडिटदेखील केलं होतं आणि जेव्हा याचा खुलासा झाला तेव्हा एम्स प्रशासनाने तपास सुरू केला. 19 ऑगस्ट रोजी येथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं. याशिवाय अन्य स्टाफला ट्रान्सफर करण्यात आलं. (crores of rupees of corruption exposed in reputed hospitals in the country ) हे ही वाचा- ‘प्रेयसीला बोलावलं तर आत्मा भटकत राहील’; सुसाइड नोट लिहून तरुणाची आत्महत्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक तपास समितीचं गठण या प्रकरणात 18 ऑगस्ट रोजी एम्स प्रशासनाने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक तपास समिती स्थापन केली. याशिवाय दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी या प्रकरणात प्राइम सस्पेक्ट दोघांना निलंबित केलं. या प्रकरणाचं गांभीर्य लक्ष घेता एम्स प्रशासनाने इकोनॉमिक ऑफेंन्स विंगमध्ये प्रकरण रेफर केलं आहे आणि या प्रकरणात एफआयआरदेखील दाखल केला आहे. ट्रॉमा सेंटरमधील सामान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतका मोठा भ्रष्टाचार केवळ दोन कर्मचाऱ्यांकडून केला जाऊ शकत नाही. बऱ्याच काळापासून हा भ्रष्टाचार सुरू असून यात अधिक जणं सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील एम्समध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी ट्रॉमा सेंटरमधील सामान खरेदीबाबत भ्रष्टाचार झाला होता. मात्र तत्कालिन सीईओ संजीव चतुर्वेदी यांच्या ट्रान्सफर केल्यानंतर प्रकरण थंड झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.