जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / शेतात पूजा रचली, एकाच वेळी बायको आणि नवऱ्याचं शीर धडा वेगळं झालं, मन सुन्न करणारं कारण समोर

शेतात पूजा रचली, एकाच वेळी बायको आणि नवऱ्याचं शीर धडा वेगळं झालं, मन सुन्न करणारं कारण समोर

मृत दाम्पत्य

मृत दाम्पत्य

पती आणि पत्नीच्या एका कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Local18 Rajkot,Gujarat
  • Last Updated :

हार्दिक जोशी, प्रतिनिधी राजकोट, 17 एप्रिल : देशात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. त्यातच आता गुजरातच्या राजकोटच्या विंछीया गावातील अंधश्रद्धेच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. येथे एका जोडप्याने त्यांच्या शेतात स्वतःचे मुंडके कापून हवनकुंडात टाकून दिले. तांत्रिक विधीनंतर या जोडप्याने प्रमुख देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्वतःचा शिरच्छेद केला.

News18लोकमत
News18लोकमत

पती-पत्नीने स्वत: असा स्टँड तयार केला होता की, त्यांची दोन्ही मुंडके एकत्र कापून हवनकुंडात पडावी. यामध्ये लोखंडी चबुतऱ्याखाली धारदार शस्त्र बसवले गेले होते. असे मानले जाते की, हे जोडपे अग्निकुंडाकडे डोके ठेवून झोपले होते आणि स्टँडवर एक जड आणि धारदार शस्त्र लटकवले होते. पुढे दोरी हातातून निसटली आणि ते जड शस्त्र थेट दाम्पत्याच्या मानेवर पडले आणि त्यांची दोन्ही डोकी धडापासून वेगळी झाली. हवनकुंडात पडलेले एक डोके स्पष्ट दिसत होते. तर नवऱ्याचे डोके हवनकुंडाऐवजी झोपडीच्या एका कोपऱ्यात पडलेले दिसले. घटनास्थळावरून दोघांच्या सुसाईड नोटशिवाय 50 रुपयांचा स्टॅम्प पेपरही सापडला आहे. हेमुभाई आणि हंसाबेन मकवाना नावाच्या या दाम्पत्याने अंधश्रद्धेला बळी पडून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. दरम्यान, कमळाची पूजा करण्याचे कारण काय आहे? त्यांना तांत्रिक विधी करण्यास कोणी प्रवृत्त केले का? तांत्रिक विधी कोणत्या उद्देशाने केला जात होता? कुटुंबातील इतर सदस्यांना तांत्रिक विधींची माहिती नव्हती का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, विंछिया येथील त्यांच्या शेतात हवन कुंडात पती-पत्नीने मस्तक अर्पण केल्याची बातमी राज्यभर पसरली. रात्री तांत्रिक पूजा करून पती-पत्नीने हवनकुंडात मस्तक अर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे. दोन्ही मुलांची काळजी न करता हेमुभाई अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. हे धक्कादायक पाऊल उचलण्याच्या एक दिवस आधी या दाम्पत्याने मुलगा आणि मुलीला मामाच्या घरी सोडले होते. तर मृताच्या वडिलांशी झालेल्या संवादात पती-पत्नी दोघेही गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक साधना करत होते आणि हवनकुंडात कमळपूजा करण्यासाठी त्यांनी स्वत: लोखंडी चबुतरा बनवला होता. सध्या दोन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. त्यांना विंछिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील तपास विंछिया पोलीस करत आहेत. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात