जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मुलांचं भांडण पोहोचलं कोर्टात; न्यायधीशांनी पालकांनाही सुनावली 45 दिवसांची शिक्षा!

मुलांचं भांडण पोहोचलं कोर्टात; न्यायधीशांनी पालकांनाही सुनावली 45 दिवसांची शिक्षा!

मुलांचं भांडण पोहोचलं कोर्टात; न्यायधीशांनी पालकांनाही सुनावली 45 दिवसांची शिक्षा!

जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जून : मुलांमध्ये झालेलं भांडण थेट न्यायालयात पोहोचल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) 45 दिवसांपर्यंत यमुना नदीची साफसफाई करण्याच्या अटीवर दाखल केलेली तक्रार फेटाळली आहे. न्यायाधीश जस्मीत सिंह यांनी सांगितलं की, केवळ आरोपींनाच नाही तर तक्रारदारांनाही यमुना नदीची स्वच्छता करावी लागेल. यांना दिल्ली जल बोर्डाच्या देखरेखीखाली 45 दिवसांपर्यंत नदीची स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाने सांगितलं की, स्वच्छता योग्य पद्धतीने केल्यानंतर जल बोर्ड आरोपी आणि तक्रारदारांना यमुना स्वच्छता प्रमाणपत्र जारी करेल. प्रमाणपत्र मिळाल्याच्या एक आठवड्याच्या आत न्यायालयात रेकॉर्डमध्ये दाखल व्हावे लागेल. हायकोर्टाने आरोपी आणि तक्रारदारांना 10 दिवसाच्या आत जल बोर्डाच्या सदस्यांनी भेट घेण्यास सांगितलं आहे. (Childrens quarrel reaches court Judge sentences parents too 45 days ) काय आहे प्रकरण? हायकोर्टात दाखल झालेल्या खटल्यात दोन्ही पक्षांच्या मुलांमध्ये खेळताना मारामारी झाली. यानंतर मुलांचे पालकही या वादात अडकले आणि हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचली. यानंतर पोलिसांनी ममता देवी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला होता. हायकोर्टात पक्षकारांनी सांगितले की, त्यांच्यात हे प्रकरण मिटले आहे, अशा परिस्थितीत दाखल झालेला खटला फेटाळण्यात यावा. दोन्ही पक्षांनी न्यायालयात सांगितले की, हा वाद वाढवल्याबद्दल त्यांना खूप पश्चाताप होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात