महेंद्र बिश्नोई (नागौर), 24 मार्च : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील कसनाळ परिसरात शेतात बांधलेल्या झोपडीजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह मिळाल्यानंतर युवकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान त्या तरूणाची हत्या केल्याची चर्चा केली जात आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. कॉल डिटेल्स काढून मारेकऱ्यांचा शोध घ्या अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
मंगलाराम याचा मृतदेह मागच्या दोन दिवसांपूर्वी आढळून आला. माहिती मिळताच जयल व बडी खातू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जयल हॉस्पिटलच्या शवागारात नेला. दरम्यान या तरुणाचा खून झाल्याचा आरोप करत कुटुंबीय व ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे. श्यामाराम यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व बाजूंनी तपास करण्याची मागणी केली आहे.
असे मित्र असण्यापेक्षा.., तिला भेटायला बोलावले अन् 6 जणांनी केला गॅंगरेप
पोलिसांनी सांगितले की, कसनाळ गावाबाहेरील शेतात बांधलेल्या झोपडीजवळ आम्हाला एक मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाबाबत आम्हाला संशय वाटत आहे. तरुणाची हत्या करून मृतदेह फेकून दिला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
डॉक्टरांच्या तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.मृत श्यामारामचे कोणाशी तरी जुने वैर असावे यातून त्याचा घातपात झाल्याचे बोलले जात असल्याचे पोलिसांनी माहिती दिली.
डोक्यावर आणि हातावर रक्ताच्या खुणाही आढळून आल्या आहेत, अशा स्थितीत श्यामाराम यांच्यात भांडण झाले असता त्यांना बेदम मारहाण होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा. श्यामारामच्या शरीरावर आणि मानेवर काही बोटांचे ठसे सापडले आहेत.
धक्कादायक! थोडं हलक्यात घेतल्यासारखं नाही ना वाटत, असं जीव देतं का कोण?
अशा स्थितीत भांडणानंतर गळा आवळून खून केल्याचीही शक्यता आहे. मात्र, पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Rajsthan