मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रामदेव बाबांचा फोटो लावून विकायचे सेक्सवर्धक गोळ्या; पोर्न साइटवर यायच्या जाहिराती, दोघांना अटक

रामदेव बाबांचा फोटो लावून विकायचे सेक्सवर्धक गोळ्या; पोर्न साइटवर यायच्या जाहिराती, दोघांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून दोन कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची सेक्सवर्धक औषधंही जप्त करण्यात आली आहेत. सध्या पोलीस, ऑपरेटरसह आणखी सात आरोपींचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून दोन कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची सेक्सवर्धक औषधंही जप्त करण्यात आली आहेत. सध्या पोलीस, ऑपरेटरसह आणखी सात आरोपींचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून दोन कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची सेक्सवर्धक औषधंही जप्त करण्यात आली आहेत. सध्या पोलीस, ऑपरेटरसह आणखी सात आरोपींचा शोध घेत आहेत.

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : सेक्सवर्धक औषधं विकण्यासाठी अनधिकृतपणे रामदेव बाबांचा (Ramdev Baba) फोटो वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही औषधं विकण्यासाठी पॉर्न साइट्सवर (Porn Site) औषधांच्या जाहिरातीवर बाबा रामदेव यांचा फोटो टाकण्यात आला होता.

आग्र्यात पोलिसांनी सेक्सवर्धक औषधं ऑनलाइन विकणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. औषधं विकण्यासाठी पॉर्न साइट्सवर औषधांच्या जाहिरातीवर बाबा रामदेव यांचा फोटो दिसत होता. शुक्रवारी हरिद्वार पोलिसांनी आग्रा येथे छापा टाकून घटनास्थळावरून दोन कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. अडीच कोटी रुपयांची औषधंही जप्त करण्यात आली आहेत. सध्या हरिद्वार पोलीस, ऑपरेटरसह सात आरोपींचा शोध घेत आहेत.

हे प्रकरण सिकंदरा भागातील नीरव निकुंजचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या दिव्य योग मंदिर पतंजली फेस - 1 बहादुराबाद या संस्थेचे प्रतिनिधी राजू वर्मा यांनी 28 जुलै रोजी बहादुराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जाहिरातीत एका पॉर्न साइटवर रामदेव बाबांचा फोटो वापरला होता. रामदेव बाबांचा फोटो वापरून सेक्स औषधं विकली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

हे वाचा - T20 World Cup Final: सुतारकाम ते वर्ल्ड कप हिरो थक्क करणारा आहे Matthew Wade चा प्रवास

एसएसपी हरिद्वारच्या सूचनेनुसार, बाबा रामदेव यांच्याशी संबंधित आयटी अॅक्ट प्रकरणाचा तपास कोतवाली राणीपूरचे प्रभारी कुंदन सिंह राणा यांना देण्यात आला. हरिद्वार पोलीस शुक्रवारी दुपारी आग्रा येथे पोहोचले होते. संध्याकाळी टीमने एसएसपी सुधीर कुमार सिंह यांची भेट घेतली. एसएसपींनी हरिद्वार पोलिसांसह नीरव निकुंजला गुन्हे शाखा आणि सिकंदरा पोलिसांकडे पाठवले.

हे वाचा - एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

या छाप्यात कर्मचारी आकाश शर्मा (रा. सेक्टर हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉलनी) आणि सतीश कुमार (रा.किशोरपुरा) यांना कॉल सेंटरमधून अटक करण्यात आली. कॉल सेंटरच्या वरती गोदाम होते. गोदाम उघडताच हरिद्वार पोलीसही आश्चर्यचकित झाले. हे गोदाम अडीच कोटी रुपयांच्या सेक्सवर्धक औषधांनी भरले होते. औषधांच्या स्वरूपात तेल, कॅप्सूल आणि गोळ्या होत्या. पोलिसांनी 1000 कॅन जप्त केले आहेत. सध्या पोलीस आणखी सात आरोपींचा शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Baba ramdev, Crime news, Generic medicine