जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / गर्लफ्रेंडच्या गर्भपातासाठी केला 30 हजारांचा सौदा, चुकीच्या ऑपरेशनमुळे झाला मृत्यू

गर्लफ्रेंडच्या गर्भपातासाठी केला 30 हजारांचा सौदा, चुकीच्या ऑपरेशनमुळे झाला मृत्यू

गर्लफ्रेंडच्या गर्भपातासाठी केला 30 हजारांचा सौदा, चुकीच्या ऑपरेशनमुळे झाला मृत्यू

आपल्या गर्भवती गर्लफ्रेंडचा गर्भपात करण्याठी तरुणानं 30 हजारांचा सौदा केला, मात्र ही बाब तरुणीच्या जीवावर बेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 14 डिसेंबर: आपली गर्लफ्रेंड (Girlfriend) प्रेगनंट (Pregnant) राहिल्यामुळे घाबरलेल्या तरुणाने एका नर्सला (Nurse) पैसे देऊन तिचा गर्भपात (Illegal abortion) करण्याची योजना बनवली. कुणालाही याची कल्पना न देता आपल्या 18 वर्षांच्या मैत्रिणीचा गर्भपात करण्यासाठी 30 हजार रुपयांमध्ये सौदा ठरवला. तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन नर्सच्या घरी पोहोचला. मात्र ऑपरेशनदरम्यान रक्तपात झाल्यामुळे तरुणीची तब्येत बिघडली. घरी केला गर्भपात राजस्थानच्या हनुमानगढ परिसरात राहणाऱ्या अंकित कुमार नावाच्या 22 वर्षांच्या तरुणाचे एका तरुणीसोबत अफेअर सुरू होतं. त्यातून गर्भवती राहिलेल्या तरुणीचा गर्भपात करण्याचा प्लॅन त्यांनी आखला. त्याच भागातील ममता नावाच्या नर्सला 30 हजार रुपये गर्भपात करण्याचं ठरलं. घटनेच्या दिवशी ममता नावाच्या नर्सने तिच्या कविता नावाच्या आणखी एका सहकारी नर्सला बोलावून घेतलं. दोघींनी मिळून तरुणीचा गर्भपात केला. मात्र या दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला आणि तरुणीची तब्येत बिघडली. त्यामुळे अंकितनं घाबरून तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथं उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. नर्स झाल्या फरार तरुणीचा मृत्यू झाल्याचं समजताच दोन्ही नर्स शहरातून गायब झाल्या. तर अंकितनेही हात वर केले. आपल्याला ही तरुणी रस्त्यात जखमी अवस्थेत दिसल्याचं सांगत मदत म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडूनही दिलं होतं. हे वाचा- डोळे उघडताच समोर दिसले 7 दरोडेखोर, गळ्याला तलवार लावून नवविवाहित जोडप्याला लुटलं वडिलांनी केली तक्रार मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि अंकितवर आपला संशय असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी अंकितला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच अंकितनं आपला गुन्हा मान्य केला आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी दोन्ही नर्सना शोधून त्यांना ताब्यात घेतलं आहे. या नर्सन यापूर्वीदेखील पैसे घेऊन असे अनेक अवैध गर्भपात केल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात