मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गर्लफ्रेंडच्या लग्नाच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर मिळाला बॉयफ्रेंडचा मृतदेह, हत्या की आत्महत्या?

गर्लफ्रेंडच्या लग्नाच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर मिळाला बॉयफ्रेंडचा मृतदेह, हत्या की आत्महत्या?

नातेवाईकांची गर्दी

नातेवाईकांची गर्दी

एका तरुणाचे शेजारील गावातील तरुणीशी प्रेमसंबंध होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

गोविंद कुमार, प्रतिनिधी

गोपालगंज, 23 मे : देशात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या लग्नाच्या दिवशीच तिच्या प्रियकराचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना बिहारच्या गोपालगंज येथील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेडिया गावातील आहे. नगर पोलीस ठाण्यांतर्गत इंद्रावा बैराम गावातील रहिवासी रवी कुमार (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रेमप्रकरणातून त्याची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचवेळी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शवविच्छेदन करून तपास सुरू केला आहे.

मृताच्या नातेवाईकांनी केला हा आरोप -

मृताचे वडील बिरेंद्र प्रसाद यांनी आरोप केला आहे की, 21 मे रोजी संध्याकाळी रवी कुमार उत्तर प्रदेशातील चैनपट्टी येथे मावशीच्या घरी निघाला होता. मात्र, रात्री तो त्याच्या मावशीच्या घरी पोहोचला नाही आणि 22 मे रोजी सकाळी त्याचा मृतदेह भेडिया गावाजवळील रेल्वे पुलाजवळ आढळून आला. डोक्यात गोळी झाडून त्याचा खून झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कुमारचे शेजारील गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलत असत. 21 मे रोजी रवी कुमारच्या प्रेयसीने त्याला फोन करुन बोलवून घेतले आणि त्याच रात्री एका कटाखाली त्याची हत्या केली.

रेल्वे रुळावर फेकला मृतदेह -

मृताचे वडील बिरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घटनेनंतर हा अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आला. नातेवाइकांनी प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत राय यांनी रेल्वे पोलिसांना ही बाब सांगून कुटुंबीयांना रेल्वे स्थानकावर जाण्यास सांगितले. हा अपघात असल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले आहेत.

या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून जीव दिला. या घटनेची माहिती रेल्वेच्या लोको पायलटनेही रेल्वे पोलिसांना दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Boyfriend, Crime, Death, Girlfriend, Local18