प्रेमात माणूस कोणत्याही थराला जातो. प्रेम दोन व्यक्तींना जवळ आणत असताना, त्याच वेळी, हे प्रेम माणसाला कधीकधी क्रूर देखील बनवते. सोशल मीडियावर एका महिलेने अशीच आपली प्रेम कहाणी (love story) शेअर केली आहे. ज्या प्रियकरासाठी तिने आपला देश सोडला, तोच तिच्या जीवावर उठला, अशी परिस्थिती इथे निर्माण झाली. प्रेयसीवर संशय घेऊन प्रियकराने आपल्या प्रेयसीवर तब्बल 11 वार केले. सुदैवाने यातील ही प्रेयसी बचावली आहे. चेक रिपब्लिक या देशात राहणारी सिंथी डोलजोवा 23 वर्षाची आहे. तिची 2020मध्ये जॅक सुट्टोसोबत भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फार समजूतदारपणा होता. सिंथीला असे वाटू लागले की, हाच आपला जीवनसाथी आहे. मात्र, तिला तिचे मित्र आणि नातेवाईंकानी सावध केले होते. मात्र, ती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. एका घटनेनंतर तिचे डोळे उघडले आहेत. तसेच तिला आता जॅकसोबत संबंध ठेवल्याचा पश्चात्ताप होत आहे. 23 वर्षाच्या सिंथीने सांगितले की, जॅकसोबत राहण्यासाठी तिने आपला देश सोडला होता. यानंतरी ती त्याच्यासाठी यूकेला आली आणि दोन्ही सोबत राहू लागले. जॅक तिला तिच्या मित्रांसोबत बोलू देत नव्हता. सोबत आपल्या परिवाराला भेटण्यासाठीही मनाई करत होता. जेव्हा पण सिंथी बाहेर जायची तो तिचे अंतरवस्त्र तपासायचा तसेच तिच्यावर इतरांसह संबंध ठेवल्याचा आरोप करायचा. मात्र, यानंतर तो नेहमीप्रमाणे चांगला वागल्यामुळे सिंथी त्याला माफ करायची. मात्र, काही वेळानंतर तो पुन्हा तसंच करायचा. ब्रेकअपनंतर केला हल्ला 2021मध्ये सिंधीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आणि ती आपल्या एका मैत्रिणीच्या घरी आली. हे जॅकला सहन झाले नाही. यानंतर त्याने तिला शेवटची भेट म्हणून रेस्टॉरंटमध्ये बोलावले. यानंतर तिचे ओळखपत्र चोरले आणि परत देण्यासाठी तिला एकांतात बोलावले. सिंथी तिथे पोहोचल्यानंतर त्याने तिच्यावर तब्बल 11 वेळा चाकून हल्ला केला. मात्र, 11 वेळा केलेल्या वारनंतरही सुदैवाने ती बचावली. तर सिंथीने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली आणि त्याला 16 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिंथीवर हल्ला करण्यापूर्वी जॅकने गुगल खून कसा करावा, याबाबत सर्च केले होते. यानंतर आता ज्या महिला, तरुणी प्रेमात आंधळ्या होतात त्यांच्यासाठी आपली प्रेमकहाणी शेअर करत आहे. ती म्हणाली, प्रत्येक नात्यात लाल झेंडे येतात. मात्र, त्याकडे लक्ष ठेवले पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.