जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेयसीच्या तेराव्यालाच तरुणाने सोडला जीव; या Love Story चा वेदनादायी अंत

प्रेयसीच्या तेराव्यालाच तरुणाने सोडला जीव; या Love Story चा वेदनादायी अंत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

या घटनेनंतर गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 27 फेब्रुवारी : प्रेमात लोक अनेक स्वप्न पाहतात, एकमेकांना अनेक वचनंही देतात. मात्र फार कमी लोक हे पूर्ण करू शकतात. उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh News) असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्या दिवशी प्रेयसीचं तेरावं होतं, (Girlfriend) त्याच दिवशी प्रियकराचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकर खूप दु:खी झाला होता. त्याच निराशेतून त्याने आत्महत्या (Suicide) केली. अद्याप ही आत्महत्या की, हत्या याबाबत उलगडा झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील लिंगज पोलीस ठाणे हद्दीतील अमरोली गावातून हा प्रकार समोर आला आहे. येथे आज रविवारी तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. 12 दिवसांपूर्वी या तरुणाच्या प्रेयसीने आत्महत्या करून स्वत:च जीवन संपवलं होतं. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकराला धक्का बसला होता. प्रेयसीच्या मृत्यूच्या दु:खात तरुणाने हे भयावह पाऊल उचलल्याची शक्यता आहे. हे ही वाचा- लिंग परिवर्तनाची इच्छा अपूर्णच; YouTube वरून हॉटेलच्या खोलीतच सर्जरी, भयावह अंत तरुणाच्या मृत्यूची सूचना मिळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरुणाच्या कुटुंबातील सदस्य सतत रडत आहेत. तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस प्रत्येक अँगलने तपास करीत आहे. पोलिसांकडून आत्महत्येशिवाय हत्येच्या पैलूनेही तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात