मुंबई, 13 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai News) अंधेरी भागातील प्रसिद्ध दीपा बारमध्ये (Andheri Deepa Bar) एक अंडरग्राउंड छुपी खोली असल्याचं समोर आलं आहे. या तळघरात 17 तरुणींना दाटीवाटीने ठेवण्यात आलं होतं. या सर्व बारबाला असल्याचं सांगितलं जात आहे. यातील अनेकांचे वय खूप कमी आहेत. ज्या छुप्या (crime news) खोलीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे, तेथे उभं राहणं देखील शक्य नव्हतं. तब्बल 15 तास सुरू असलेल्या या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी सोशल सर्विस ब्रान्चच्या टीमने या गुप्त खोलीचा गूढ उघड केलं. विशेष म्हणजे या खोलीत जाण्याचा रस्ता मेकअप रूमला लागून असलेल्या भिंतीवरुन आरशाच्या मागून होता. यात ऑटोमेटिक इलेक्ट्रिक दारं लावण्यात आली होती. या खोलीत एक AC देखील होता. यात झोपण्यासाठी अंथरून टाकण्यात आलं होतं. सोशल सर्विस ब्रान्चचे डीसीपी राजु भजबळ यांनी सांगितलं की, मुंबतील एका एनजीओच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
भुजबळ यांनी पुढे सांगितलं की, ही रेड रविवारी सायंकाळी टाकण्यात आली. आणि संपूर्ण रात्रभऱ ही कारवाई सुरू होती. 15 तासांच्या कडक कायदेशीर कारवाईनंतर 17 बारबालांना मुक्त करण्यात आलं आणि बारचे मॅनेजर, कॅशिअऱसह 3 स्टाफला अटक करण्यात आली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. या सर्वांवर कोविड नियमांचं उल्लंघन आणि ऑर्केस्ट्राच्या परवानगीवर डान्स बार चालविण्याच्या प्रकरणात केस दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्येही सुरू होता बार.. मुंबईत कोरोनाच्या नियमावलीनुसार, सर्व डान्सबारना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही हा बार त्या काळातही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दररोज येथे शेकडो लोक येतात आणि बारबालांवर पैसे उडवतात. पोलिसांच्या रेडपासून बचाव करण्यासाठी या गुप्त खोली बनवण्यात आली होती.
हे ही वाचा-
नागपुरात हायप्रोफाइल SEX रॅकेटचा पर्दाफाश; सलूनमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार
बारमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टम पोलिसांपासून बचाव करण्यासाठी या डान्स बारमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टम लावण्यात आला होता. या भागात पोलिसांची गाडी येताच बारच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यामुळे आतील लोक अलर्ट होतं, आणि मुलींना तातडीने गायब केलं जातं. यापूर्वीही येथे अनेकदा रेड टाकण्यात आली होती, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं.
असा झाला बारमधील गुप्त खोलीचा खुलासा.. बारमध्ये बारबाला असल्याची पक्की माहिती असतानाही रेड मारल्यानंतर बारमधील बाथरूम, स्टोरेज रूम, किचन प्रत्येक ठिकाणी छापा मारल्यानंतर पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. यादरम्यान NGO ची टीम मेकरूममध्ये आले तर त्यांना मोठा आरसा दिसला. त्यावर संशय़ वाटल्यामुळे त्यांनी तो हटवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तो आरसा निघत नसल्यामुळे शेवटी हातोड्याने आरसा तोडण्यात आला.
अनेक दिवसांपर्यंत तरुणींना येथे ठेवण्याचा होता प्लान… आरसा तोडल्यानंतर आतमध्ये मोठी गुप्त खोली दिसून आली. यात 17 बारबालांना लपून ठेवलं होतं. यानंतर या खोलीतून एकामागोमाग एक बारबाला बाहेर पडू लागले. AC आणि अंथरूणाशिवाय येथे फूड पॅकेट्सदेखील होते. मात्र व्हेंटिलेशनसाठी काहीच जागा नव्हती. बारबालांना बरेच दिवस या खोलीत ठेवण्याचा बार मालकाचं प्लानिंग होतं.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.