Home /News /crime /

कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला...; यांनी गँगस्टर होण्यासाठी मित्रालाच संपवलं

कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला...; यांनी गँगस्टर होण्यासाठी मित्रालाच संपवलं

हे आरोपी गँगस्टर होण्याचं स्वप्न पाहत होते.

    भोपाळ, 17 एप्रिल : भोपाळ (Madhya Pradesh News) जिल्ह्यातील भानपुरामध्ये गेल्या 11 एप्रिल रोजी हत्याकांडाचा मोठा खुलासा झाला. पोलिसांनी हत्याकांडातील तिन्ही आरोपींना (Crime News) अटक केली आहे. आरोपींनी पोलिसांसमोर त्यांना मोठा गँगस्टर होण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपींना गँगस्टर व्हायचं होतं आणि उज्जैनचे गँगस्टर दुर्लभ कश्यप प्रमाणे होऊ इच्छित होते. आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. गेल्या 11 एप्रिल रोजी तिघंनी मिळून शितला देवीच्या मंदिराजवळील भागात 22 वर्षीय हिंमाशू बैराची याची सुऱ्याने हत्या केली होती. यानंतर हिमांशूला उपचारासाठी राजस्थानच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे उपचारादरम्यान हिमांशूचा मृत्यू झाला. हत्येचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी मारेकऱ्याची ओळख पटवली असून यात विनय जादौन (19), दीपक गुर्जर (21) आणि अश्मीर मंसूरी (20) यांचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हे ही वाचा-डोळ्यासमोरच पतीने आपल्याच पत्नीवर दोघांना करायला सांगितला बलात्कार, लातूर हादरलं इन्स्टाग्राम ते हत्येपर्यंतच प्रवास... पोलिसांनी या प्रकरणात माहिती देताना सांगितलं की, तिन्ही आरोपी मोठा गुंड होण्याचं स्वप्न पाहत होते. आरोपी सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. सोबतच उज्जैनच्या गँगस्टर दुर्लभ कश्यपला आपला हिरो मानत होते. पोलिसांनी सांगितलं की, तिन्ही आरोपी सोशल मीडियावर 302 नावाच्या ग्रुपने जोडले गेले होते. ग्रुपच्या प्रोफाइलवर लिहिलं आहे की...जे आमच्या डोळ्यात खटकतात ते थेट स्मशानात जाऊन भटकतात. आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की, ऑगस्ट महिन्यात एका वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची भेट हिमांशू बैरागीसोबत झाली होती. यादरम्यान आरोपींचा हिमांशूसोबत वाद झाला होता. यावरुन आरोपींच्या मनात हा राग होता. संधी साधत 11 एप्रिल रोजी आरोपींनी हिमांशूची हत्या केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang murder, Madhya pradesh

    पुढील बातम्या