Home /News /crime /

Datting aap वरील गर्लफ्रेंडवर बँक मॅनेजर फिदा, 5.7 कोटी केले ट्रान्सफर!

Datting aap वरील गर्लफ्रेंडवर बँक मॅनेजर फिदा, 5.7 कोटी केले ट्रान्सफर!

एका बँक मॅनेजरनं डेटिंग अ‍ॅपवरील (Datting aap) कथित गर्लफ्रेंडच्या खात्यामध्ये 5 कोटी 70 लाख रूपये पाठवल्याचं उघड झालं आहे.

    मुंबई, 26 जून : एका बँक मॅनेजरनं डेटिंग अ‍ॅपवरील (Datting aap) कथित गर्लफ्रेंडच्या खात्यामध्ये 5 कोटी 70 लाख रूपये पाठवले आहेत. बेंगळुरूमधील हनुमंत नगरमधील इंडियन बँक मॅनेजरनं हा प्रकार केलाय. हरीशंकर असं त्याचं नाव आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. इंडियन बँकेच्या झोनल मॅनेजरनं केलेल्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी मॅनेजरला 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या ब्रँचचा सहाय्यक मॅनेजर आणि क्लार्क याांचाही या प्रकरणात समावेश आहे. 13 ते 19 मे दरम्यान हा प्रकार घडला आहे. 'सायबर गुन्हेगारांनी आपल्याला एक डेटिंग अ‍ॅप वापरण्याचे प्रलोभन दिले होते,' असा दावा बँक मॅनेजरनं केला आहे. त्याच्या या दाव्याची सत्यता पडताळण्याचं काम पोलीस करत आहेत. ग्राहकांच्या खात्यात अफरातफरी या प्रकरणातील तक्रारीनुसार, 'एका महिला ग्राहकानं 1.3 कोटी रूपये फिक्स डिपॉझिट म्हणून बँकेत जमा केले होते. त्यानंतर त्याच डिपॉझिटच्या आधारावर महिलेनं 75 लाखांचे कर्ज घेतले. यावेळी महिलेनं सर्व आवश्यक कागदपत्र जमा केले. पण, आरोपी अधिकाऱ्यानं या कागदपत्रांमध्ये फेरफार केला. इतकंच नाही तर आरोपीनं अनेक टप्प्यात ओव्हरड्राफ्ट म्हणून 5.7 कोटी रूपये जमा केले. हे सर्व पैसे पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या बँकांच्या 28 खात्यांमध्ये पाठवण्यात आले होती. कर्नाटकातील दोन बँक खात्यामधील 136 व्यवहारातून हे पैसे पाठवण्यात आले आहेत. हरीशंकरनं या प्रकरणात त्याचा सहाय्यक मॅनेजर आणि क्लार्कची मदत घेतल्याचा आरोप आहे. मात्र त्याचे अद्याप स्पष्ट पुरावे सापडलेले नाहीत. या दोघांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरी छापा; पिशव्यांमध्ये भरलेले करोडो रूपये, मोजण्यासाठी आणावी लागली मशीन हे सर्व प्रकरण उघड होताच इंडियन बँकेचे झोनल मॅनेजर डीएस मूर्तीनं तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मॅनेजर हरीशंकर आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या चौकशीत मॅनेजरनं डेटिंगची कबुली दिलीय. त्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याची 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Bengaluru, Financial crime

    पुढील बातम्या