नवी दिल्ली, 10 जून : दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या (Delhi News) द्वारका स्थित एका हॉटेलात 28 वर्षी महिलेसोबत कथितरित्या बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी पुरुषासोबत एका डेटिंग अॅपच्या (Dating App) मदतीने महिलेची भेट झाली होती. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत सांगितलं की, आरोपी हैद्राबादचा राहणारा आहे आणि घटनेनंतर फरार झाला आहे. महिलेने पोलिसात 3 जून रोजी दाखल केलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, आरोपीसोबत तिची ओळख डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. 30 मे रोजी त्याला भेटायला ती हॉटेलात गेली होती, येथे त्यांनी महिलेवर बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, यानंतर आरोपी तिचा फोन उचलत नाही. पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. आरोपी हैद्राबादचा राहणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.