Home /News /crime /

मोबाइल बॅटरीशी खेळता खेळता मोठा ब्लास्ट; मुलाच्या हाताची 2 बोटं उडाली, भयंकर घटना

मोबाइल बॅटरीशी खेळता खेळता मोठा ब्लास्ट; मुलाच्या हाताची 2 बोटं उडाली, भयंकर घटना

9 वर्षांचा मुलगा मोबाइलची बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक खेळणीसोबत खेळत होता.

  भोपाळ, 3 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) सागरमधील राहतगड येथे घरात खेळत असताना 9 वर्षांच्या मुलाच्या हातातील मोबाइलची बॅटरी फुटल्याने (Mobile battery Blast) मोठा अपघात घडला. यानंतर स्फोटाचा मोठा आवाज झाला. यात अपघातात मुलाच्या हाताची दोन बोटं उडाली. ब्लास्टचा आवाज ऐकून शेजारीही तेथे पोहोचले. यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, शहजाद इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि जुन्या मोबाइल बॅटरीशी खेळत होता. इलेक्ट्रॉनिक खेळण्याच्या तारेचा बॅटरीला स्पर्श झाला आणि घरात मोठा ब्लास्ट झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर शहजादला गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलं.

  जखमी शहजादचे काका जहीर यांनी सांगितलं की, सोमवारी शहजाद घरात एकटा होता. सर्वजण घराच्या बाहेर काम करीत होते. शहजाद मोबाइलच्या बॅटरीने खेळत होता. तेव्हा अचानक ब्लास्ट झाला. बॅटरी इतक्या मोठ्याने फुटली की, शहजादचा उजवा हात जखमी झाला. हाताची दोन बोटंच उडाली. शरीराच्या अन्य भागांवरही जखमा झाल्या आहेत. बॅटरी इतकी जुनी असल्याची कोणालाही माहिती नव्हती. काही वर्षांपूर्वी मोबाइलची बॅटरी खराब झाल्यानंतर काढून ठेवण्यात आली होती.

  हे ही वाचा-घरी बोलावून प्रेयसीचा गळा दाबून केला खून, मृतदेह फेकला नाल्यात

  या कारणांमुळे फुटते बॅटरी...

  1 मोबाइलची बॅटरी आवश्यकतेपेक्षा जास्त चार्ज करणे, हा बॅटरी फुटण्याचं सर्वात मोठं कारण आहे. जेव्हा बॅटरी आवश्यकतेपेक्षा जास्त चार्ज केली जाते, तर कॅथोडहून एनोडवर आवश्यकतेपेक्षा जास्त लिथियम आयर्न पोहोचला जातो.

  2 गेल्या काही वर्षांपासून मोबाइल कंपन्या स्मार्ट फोनसाठी लवकर चार्ज होणारे (Fast Charging) चार्जर देत आहेत. यातून कमी वेळात बॅटरीमध्ये जास्त एनर्जी स्टोअर केली जाते.जोपर्यंत त्या चार्जरने त्या कंपनीचा मोबाइल चार्ज करीत असाल तर काही समस्या नाही. मात्र जर त्या चार्जरने दुसरा मोबाइल चार्ज करीत असला तर मोबाइल फुटण्याची शक्यता वाढते. बॅटरीचा ब्लास्ट कसा रोखता येऊ शकतो.. - ओरिजनल चार्जरनेच बॅटरी चार्ज करावी. - चार्जिंगदरम्यान फोनचा वापर करू नये. - फोन उन्हात जास्त वेळ ठेवू नये. - फोनची बॅटरी आवश्यकतेपेक्षा जास्त चार्ज करू नये. - ज्या अॅप्समुळे फोन गरम होतो, अशांचा वापर टाळावा.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Madhya pradesh, Mobile Phone, Phone battery

  पुढील बातम्या