जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Balbharati : 'बालभारती'चे डोमेन विकणे आहे फक्त 2 हजार डॉलर? जाहिरातीने खळबळ

Balbharati : 'बालभारती'चे डोमेन विकणे आहे फक्त 2 हजार डॉलर? जाहिरातीने खळबळ

'बालभारती'चे डोमेन विकणे आहे फक्त 2 हजार डॉलर?

'बालभारती'चे डोमेन विकणे आहे फक्त 2 हजार डॉलर?

Balbharati : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात ‘बालभारती’ या सस्थेच्या नावाने एक जाहिरात व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 18 जुलै : शालेय पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं काम करणारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात ‘बालभारती’ या सस्थेच्या नावाने आज एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या संस्थेच्या वेबसाईटचं ऑनलाईन नाव ‘Balbharati.in’ हे डोमेन नेम विकणे आहे, अशी जाहिरात बालभारतीच्या वेबसाईटवरुन प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर बालभारतीकडून खुलासा करण्यात आला आहे. ‘Balbharati.in’ विकणे आहे? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात बालभारती या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण संस्थेच्या संकेत स्थळाचे डोमेन balbharati.in हे दोन हजार युएस डॉलर किंमतीला विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर बालभारतीने अधिकृत खुलासा केला आहे. सायबर हॅकरने बालभारतीचे डोमेन हॅक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित तांत्रिक विभागाकडे रितसर तक्रार केल्याचंही बालभारतीने म्हटलं आहे. तसंच बालभारतीची वेबसाइट देखील व्यवस्थित सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. बालभारती काय काम करते? ‘बालभारती’ कोणती कामे करते आणि कशा पद्धतीने करते ते अनेकांना माहीत नसल्यामुळे त्याची थोडक्यात माहिती करुन घेऊन. बालभारती शालेय पाठ्यपुस्तके तयार करते, छापते आणि त्यांची विक्री करते. बालभारती दरवर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि सिंधी या 8 भाषामाध्यमांतून 932 शीर्षकांच्या 9 कोटी पुस्तकांची छपाई करते. पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या बालभारतीच्या 9 विभागीय भांडारांतून पाठ्यपुस्तकांचे वितरण होते. मुंबईच्या कार्यालयातून मुद्रणाचे कामकाज चालते. बालभारतीचे स्वत:चे मुद्रणालय नाही. देशभरातील विविध मुद्रणालयांकडून पाठ्यपुस्तकांची छपाई करून घेतली जाते. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांचे आवडते ‘किशोर’ मासिक बालभारतीकडूनच प्रकाशित होते. अतिशय आकर्षक आणि सचित्र इंग्रजी-मराठी शब्दकोश, निवडक बालभारतीचे 14 खंड व इतर अनेक पाठ्येतर पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात