Home /News /crime /

मूल होण्याचं आमिष दाखवून महिलांवर लैंगिक शोषण करणाऱ्या ढोंगी बाबाला अटक, खोलीत बोलवायचा आणि...

मूल होण्याचं आमिष दाखवून महिलांवर लैंगिक शोषण करणाऱ्या ढोंगी बाबाला अटक, खोलीत बोलवायचा आणि...

मूल होण्याचं आमिष दाखवून लैंगिक शोषण (Sexual abuse) करणाऱ्या ढोंगी बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    पाटना, 13 मे : मूल नसलेल्या महिलांना मूल होण्याचं आमिष दाखवून लैंगिक शोषण (Sexual abuse) करणाऱ्या ढोंगी बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कैशास पासवान उर्फ चिल्का बाबा महिलांना मूल होण्यासाठी बोलावत होता. जडीबुटी देत असल्याचं सांगून नशेचं औषध प्यायला देत होता. यानंतर महिलांवर बलात्कार करीत होता. याबाबत पूर्णिया (Bihar News) येथील एका दाम्पत्याने चिल्का बाबावर बलात्काराचा आरोप लावत पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला त्यानंतर आरोपीचं धक्कादायक कृत्य समोर आलं. चिल्का बाबा इतरही प्रकरणात यापूर्वी तुरुंगात गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून हा आरोपी महिलांची फसवणूक करीत होता. मूल होण्याचं आमिष दाखवून तो महिलांचं लैंगिक शोषण करीत होता. मात्र बदनामीच्या भीतीने कोणतीही महिला पुढे येऊन तिच्यासोबत घडलेलं कृत्य सांगत नव्हती. मात्र पूर्णिया येथे राहणाऱ्या महिलेसोबत जेव्हा अशा प्रकारचं कृत्य घडलं यानंतर तिने पतीला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडितेने बाबा विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. अन्य आक्षेपार्ह साहित्यासह अन्य महिलांचे सापडले फोटो... मधेपूरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिल्का बाबा याचा गुन्हेगारीचा इतिहास आहे. तो यापूर्वीही अन्य प्रकरणात तुरुंगात गेला आहे. या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर पोलिसांनी बाबाला अटक केली. मात्र या घटनेनंतर तो फरार झाला होता. शेवटी पोलिसांनी त्याचा शोध लावला आणि त्याला खळी फोडायला पाठवण्यात आलं आहे. त्याच्या विविध ठिकाणांहून अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले आहेत. याशिवाय काही महिलांचे फोटोदेखील आहेत. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या