जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 10 लाखांच्या कारमधून आले अन् चोरुन चोरलं तर काय मीठ; VIP चोर सीसीटीव्हीत कैद

10 लाखांच्या कारमधून आले अन् चोरुन चोरलं तर काय मीठ; VIP चोर सीसीटीव्हीत कैद

VIP चोर सीसीटीव्हीत कैद

VIP चोर सीसीटीव्हीत कैद

Amethi VIP Thief: चोरीची ही घटना यूपीमधील अमेठीची आहे. चोरट्यांनी 10 लाख किमतीच्या कारमधून 6 पोती मीठ चोरुन नेले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमेठी, 9 एप्रिल : काही दिवसांपूर्वी महागड्या गाडीत रस्त्यावरील कुंड्या चोरणारे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. 10 लाखांच्या कारमधून आलेल्या चोरट्यांनी चक्क मिठाच्या पोत्यांवर डल्ला मारला आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचा सर्व प्रकार कैद झाला आहे. घटना अमेठीची आहे. अयोध्या-प्रयागराज महामार्गावर चौकीपासून अवघ्या 10 मीटर अंतरावर चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पीडितेने रामगंज चौकीत केली आहे. खरंतर, हे संपूर्ण प्रकरण रामगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अयोध्या प्रयागराज महामार्गावरील रामगंज शहरात घडला. रात्री उशिरा एका आलिशान कारमध्ये आलेल्या चोरट्यांनी दुकानासमोर ठेवलेल्या मीठाची 6 पोती कारमध्ये भरली. चौकीपासून अवघ्या 10 मीटर अंतरावर झालेल्या चोरीच्या घटनेची कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मीठ चोरीची ही घटना कैद झाली आहे. या चोरीच्या घटनेची तक्रार पीडित महिलेने रामगंज पोलीस चौकीत केली आहे. पीडित दुकान मालक ब्रिजेश कुमार कासौधन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रात्री दुकान बंद करून झोपले होते. सकाळी त्यांनी दुकान उघडले असता त्यांच्या घरासमोर ठेवलेल्या मिठाची 6 पोती गायब असल्याचे दिसले, ज्याची किंमत 7500 रुपये होती. दुकानदाराने त्यांच्या दुकानात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता, अज्ञात चोरटे आलिशान कारमध्ये मिठाच्या पोती घेऊन जाताना दिसले. रामगंज पोलीस चौकीपासून दुकानाचे अंतर अवघ्या काही मीटरचे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाचा - पोटच्या पोरीनं आईवर 12, बापावर 24 तर भावावर केले 8 वार, कारण वाचून पायाखालची… अलिशान गाडीतून रोपांची चोरी जी-20 शिखर परिषदेसाठी लावण्यात आलेली कुंड्या चोरीप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. गुरुग्राम पोलिसांनी मनमोहनला अटक केली असून कारमधून चोरीच्या कुंड्या जप्त केल्या आहेत. कार हरियाणातील हिसार येथून नोंदणीकृत असून आरोपी गुरुग्रामचा रहिवासी आहे. चोरट्यांच्या लक्झरी कारचा नंबरही व्हीआयपी आहे. चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीएमडीएने पोलिसांत तक्रार दिली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुरुग्राममधील शंकर चौकातील आहे. व्हिडीओमध्ये एक गाडी येऊन थांबते असे दिसते. दोन जण गाडीतून खाली उतरतात. चौकात सजावटीसाठी ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या कुंड्या उचलून गाडीच्या डिक्कीत ठेवली जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , theft
  • First Published :
जाहिरात
जाहिरात