बदायूंमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे वडील बदायूं (Badaun) मधील जिला पंचायत राज विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होते. अचानक एकेदिवशी ते बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाही. वडील बेपत्ता झाल्यामुळे घरात त्यांचा पगार येणंही बंद झालं होतं. त्यामुळे घरात आर्थिक चणचण सुरू झाली होती.
वडील बेपत्ता झाल्याच्या बराच वेळ आधी तरुणाची पत्नीदेखील (Wife) त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यांचं लग्न 2016 झालं होतं. त्यावेळी दोघे अल्पवयीन होते. तब्बल 6 महिने सोबत राहिल्यानंतर दोघांमझ्ए वाद सुरू झाला व त्यातच पत्नी माहेरी निघून गेली. नातेवाईकांनी त्यावेळी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पती दारू पित असल्याचं सांगून तिने घरी जाण्यास नकार दिला.
दरम्यान वडिलांचा शोध घेण्यासाठी तरुणाने बदायूच्या जिल्हा पंचायत राज विभागात RTI केला. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनंतर मुलाला धक्काच बसला. वडिलांचा पगार नियमितपणे होत असून आता ते संभल जिल्ह्यात राहत आहेत. मुलगा जेव्हा वडिलांना शोधत त्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. तर तरुणाची पत्नी आणि बेपत्ता झालेले वडील एकत्र राहत होते. त्याच्या पत्नीने पतीच्या 48 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न केलं होतं.
या प्रकारानंतर नेमकं काय म्हणावं हे त्याला कळत नाही. त्याची पत्नी सावत्र आई होऊन त्याच्या समोर उभी राहिली. हे पाहून रागाच्या भरात तरुणाने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणासोबत जाण्यास तिने नकार दिला. ती पुढे म्हणाले की, मी आपला दुसरा पती म्हणजेच तरुणाच्या वडिलांसोबत खूश आहे. आणि त्यांच्यासोबत राहू इच्छिते.
यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरुण आपल्या लग्नाचा कोणताही पुरावा दाखवू शकला नाही. तसंही अल्पवयात केलेल्या लग्नाला कायदेशीर मान्यत नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही.