जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ठाण्यात बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकेतील लोकांना बनवत होते शिकार

ठाण्यात बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकेतील लोकांना बनवत होते शिकार

ठाण्यात बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकेतील लोकांना बनवत होते शिकार

कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना कर्ज देऊन फसवणूक केली.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

अमित राय, प्रतिनिधी ठाणे, 2 ऑक्टोबर : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी 16 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये कॉल सेंटरचा मालक सिद्धेश सुधीर भाईडकर (33) आणि सानिया राकेश जैस्वाल (26) यांचा समावेश आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - कॉल सेंटरच्या माध्यमातून आरोपी अमेरिकेतील लोकांना संपर्क करायचे आणि त्यांना कर्ज द्यायचे. यानंतर बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर आरोपी त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे. आज रविवारी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.बी.मुर्तडक यांनी सांगितले की, कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना कर्ज देऊन फसवणूक केली. बनावट कॉल सेंटर प्रकरणात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. पोलिसांच्या पथकाने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कॉल सेंटरवर छापा टाकून तेथे काम करणाऱ्या तीन महिलांसह इतरांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, कॉल सेंटर्सच्या माध्यमातून आरोपी अमेरिकेतील लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना कर्जाची ऑफर देत असत. बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर आरोपी त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे. अमेरिकेतील समन्वयक एजंट पैसे गोळा करायचा आणि त्यातून आपला वाटा घेऊन हवालाद्वारे भारतात हस्तांतरित करायचा. हेही वाचा -  माजी महापौरांवर AK-47 ने गोळ्या झाडणाऱ्या मंटू शर्माचा खेळ खल्लास, मुंबईतून अटक

अटक करण्यात आलेल्या 16 जणांमध्ये कॉल सेंटरचा मालक सिद्धेश सुधीर भाईडकर (33) आणि सानिया राकेश जैस्वाल (26) यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात