जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / प्रेयसीला भेटायला जाण्याचा निर्णय चुकला; तरुणाने गमावला जीव, गर्लफ्रेंडसह 5 जणांना अटक

प्रेयसीला भेटायला जाण्याचा निर्णय चुकला; तरुणाने गमावला जीव, गर्लफ्रेंडसह 5 जणांना अटक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका तरुणाचे वर्षभरापासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

  • -MIN READ Local18 Gumla,Jharkhand
  • Last Updated :

रूपेश कुमार भगत, प्रतिनिधी गुमला, 17 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या जिल्ह्यातील सिसाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुम्हार मोड आश्रम शाळेच्या मागे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत तरुण हा बिहारमधील गया जिल्ह्यातील इमामगंज पोलीस स्टेशन अंतर्गत बडका पारसिया येथील रहिवासी होता. 21 वर्षीय कुंदन कुमारची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची शक्यता नातेवाईक व्यक्त करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

गयाहून गुमला येथे पोहोचलेल्या कुंदनच्या वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन ते गयाकडे रवाना झाले आहेत. त्याचबरोबर एका मुलीसह 5 जणांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. कुंदनचे वडील भगवान साव यांनी सांगितले की, कुंदन हा गया येथे मित्रासोबत भाड्याच्या घरात राहत होता. तसेच तो पेंटिंगचे काम करत असे. त्याच्या मित्राने 15 एप्रिल रोजी फोनवर सांगितले की, कुंदन 11 एप्रिल रोजी गुमला येथे गेला होता. पण तो तेथून अजून परतला नाही, तसेच फोनवर संपर्कही होत नाही आहे. यानंतर कुंदनचा मित्र भगवान साव रांचीला आला. भगवान साव याने सांगितले की, कुंदनचे गुमला येथील एका मुलीशी वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघेही फोनवर बोलायचे, रोज भेटायचे. याचदरम्यान, तो 11 एप्रिल रोजी त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गुमला येथे जाणार असल्याचे सांगून निघाला होता. मात्र, यानंतर तो परत आला नाही. यानंतर भगवान साव गुमला येथे पोहोचला. येथे गुमला पोलीस ठाण्यात संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला असता पोलिसांनी भगवान साव याला अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी मृताचा फोटो दाखवला असता तो मृतदेह कुंदनाचाच असल्याचे समोर आले. त्यानंतर पोस्टमॉर्टम फॉर्म घेऊन मृतदेह यांच्या ताब्यात दिला. येथे स्टेशन प्रभारी आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, अज्ञात तरुणाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याची अंदाज व्यक्त करत याप्रकरणी मृताच्या वडिलांनी तक्रार केली आहे. तसेच प्रेयसीसह ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी लवकरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात