धक्कादायक! तरुणीने एक दिवस आधीचं केली स्वत:च्या मृत्यूची भविष्यवाणी; हा प्रकार पाहून पोलिसही हादरले!

धक्कादायक! तरुणीने एक दिवस आधीचं केली स्वत:च्या मृत्यूची भविष्यवाणी; हा प्रकार पाहून पोलिसही हादरले!

अनेक व्यक्ती आत्महत्येआधी काही चिठ्ठी लिहून ठेवण्याचे प्रकार आपल्याला माहीत आहेत. इथं मात्र स्वत:च्या हत्येची आधीच कल्पना होती.

  • Share this:

ब्राझिलिया, 20 फेब्रुवारी : ख्रिश्चन गुमेरस या 17 वर्षांच्या युवतीची हत्या (murder) ब्राझीलच्या (Brazil) अमेझॉनस इथं करण्यात आली. आपल्या अकाली मृत्यूबाबत ख्रिश्चनला आधीपासूनच काही कल्पना होती, (death prediction) असं चित्र तिनं सोशल मीडियावर केलेल्या लिखाणातून समोर आलं आहे.

अमेझॉनसमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ख्रिश्चननं आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी (a day before death) सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. (social media post) त्यात तिनं म्हटलं, की मी इथं आले आहे सगळ्यांना गुडबाय (good bye) म्हणायला. आता मी लवकरच मरणार आहे.'

पुढं तिनं लिहिलं, की 'ड्रग डीलर्सकडून (drug dealers) मी जवळपास 40,437 रुपये उधार घेतले होते (borrowed). ही रक्कम मला चुकवता येत नाही. आता या प्रकरणातूनच माझी हत्या होणार आहे.' विशेष म्हणजे हत्येनंतर आपला मृतदेह (dead body) कुठं सापडेल हेसुद्धा तिनं लिहून ठेवलं होतं.

ख्रिश्चनची खरोखर दुसऱ्या दिवशी हत्या झाली. त्यानंतर तिच्या अकाउंटवरून अजून एक पोस्ट करण्यात आली. यात ख्रिश्चनचा मृतदेह कुठं आहे ते सांगितलं होतं. ही पोस्ट खून करणाऱ्यानं ख्रिश्चनच्या प्रोफाईलवरून केली असं मानलं जातं आहे. खून करणाऱ्यानं लिहिलं, की कमांडो वॉर्मेल्हो या गँगनं (gang) ख्रिश्चनची हत्या केली.

हेही वाचाउन्नाव प्रकरणात कीटकनाशक मिश्रित पाणी पाजून दोन अल्पवयीन मुलीची हत्या

पोलिसांच्या सांगण्यानुसार, ख्रिश्चन हरवल्याची माहिती 12 फेब्रुवारीलाच मिळाली होती. मात्र पोलीस घटनास्थळावर पोचण्याआधीच तिची हत्या करण्यात आली. ख्रिश्चननं फेसबुक पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणेच तिची तशीच हत्या झाली. हत्या करणाऱ्यानं 13 फेब्रुवारीला ख्रिश्चनला गोळी मारली. पोलिसांचं म्हणणं आहे, की कमांडो वॉर्मेल्हो या गँगचा ख्रिश्चनच्या हत्येशी काही संबंध नाही. आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी या गॅंगचं नाव घेतलं आहे. लवकरच आरोपींना पकडलं जाईल.

Published by: News18 Desk
First published: February 20, 2021, 4:56 PM IST

ताज्या बातम्या