मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडाचं स्वागत करणाऱ्या 83 जणांना अटक, काय आहे प्रकरण?

जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडाचं स्वागत करणाऱ्या 83 जणांना अटक, काय आहे प्रकरण?

जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडाचं स्वागत करणाऱ्या 83 जणांना अटक, काय आहे प्रकरण?

जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडाचं स्वागत करणाऱ्या 83 जणांना अटक, काय आहे प्रकरण?

मित्राच्या स्वागताला गेलेल्या 83 जणांना पोलिसांनी तुरुंगात टाकलंय. जाणून घ्या नक्की काय झालंय?

नवी दिल्ली, 17 जून : अनेकदा आपण एखाद्या पाहुण्याला किंवा मित्राला आणायला एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर जातो. त्याच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन जातो. त्याचं स्वागत केल्याबद्दल पोलिसांनी तुम्हाला अटक केली आहे का?, तुम्ही म्हणाल हे काय विचारत आहे मी? पण दिल्लीत असं घडलंय. मित्राच्या स्वागताला गेलेल्या 83 जणांना पोलिसांनी तुरुंगात टाकलंय. दिल्लीतील तिहार तुरुंगातून (Tihar Jail) जामिनावर बाहेर आलेल्या मित्राचं जोरदार स्वागत करणाऱ्या 83 जणांनाच तुरुंगात जावं लागलं. हा प्रकार पश्चिम दिल्लीतील दिल्ली कँट पोलीस स्टेशनच्या (Police Station) परिसरात गुरुवारी (16 जून 22) घडला, पोलिसांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर गोंधळ घालणं, दहशत (panic) निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी तब्बल 83 जणांना अटक केली आहे. त्यातील 33 जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा तसंच शस्त्रास्त्र कायद्याचं उल्लंघन (Arms act) केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. एवढंच नाही तर पोलिसांनी त्यांच्याकडून 19 वाहनं आणि 2 दुचाकीही जप्त केल्या आहेत.

दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी मनोज सी. यांनी याला वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती देताना त्यानी सांगितले की, आबिद अहमद (रा. तुघलकाबाद एक्स्टेंशन, गल्ली क्रमांक 6) याची काल रात्री तिहार कारागृहातून जामिनावर सुटका झाली. वसंत कुंज उत्तर येथील एका खटल्याप्रकरणी तो तुरुंगात होता. आरोपी सुटणार असल्याने त्याला घेण्यासाठी मोठ्या संख्येने मित्र आणि साथीदार आले आहेत, व ते तिहार जेलमधून तुघलकाबादला जात आहेत, याची माहिती पोलिसांना मिळाली.

जामिनावर सुटलेल्या आबिदसोबत मोठ्या संख्येने ते सर्वजण जमा झाले होते, यात गुंड प्रवृत्तीचे, पोलिसांनी वाईट चारित्र्याचे म्हणून घोषित केलेलेही अनेक जण होते. हे सर्वजण आबिद अहमद या आरोपीला वाहनांमध्ये बसवून मोठ्याने हॉर्न वाजवत आरडाओरड करत, घेऊन जात होते. तसंच त्यांच्या कारमधील गाण्यांचे आवाजही जोरजोरात सुरू होते.

रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार सुरू असताना पोलिसांच्या पथकाने त्या ताफ्याला किर्बी प्लेस (kirbi place) इथे थांबवत सर्वांना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. चौकशीनंतर 83 जणांना अटक करण्यात आली, कारण हे सर्व लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत होते. ज्या वाहनांसह ते गोंधळ घालत होते, त्या 19 कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर 2 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. कारवाई केलेल्या 83 जणांव्यतिरिक्त एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले, त्याला नंतर समज देऊन सोडण्यात आलं.

First published:

Tags: Crime news, Delhi Police, Tihar jail