जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाकिस्तानात अंत्यविधीवेळी सुरू असलेल्या नमाजादरम्यान दोन गटात गोळीबार, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू

पाकिस्तानात अंत्यविधीवेळी सुरू असलेल्या नमाजादरम्यान दोन गटात गोळीबार, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू

पाकिस्तानात अंत्यविधीवेळी सुरू असलेल्या नमाजादरम्यान दोन गटात गोळीबार, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू

अंत्यविधीवेळचा नमाज सुरू असतानाच त्या दोन्ही गटांमध्ये जमिनीच्या विषयावरून (Land Dispute) वादावादी झाली. शेवटी त्या वादावादीचं रूपांतर हिंसेत झालं आणि अनेकदा गोळीबार (Round of Firing) झाला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    इस्लामाबाद, 17 सप्टेंबर : पाकिस्तानातल्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतात (Khyber pakhtunkhwa Province) एका अंत्ययात्रेदरम्यान झालेल्या गोळीबारात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या लोअर डीर (Lower Dir) जिल्ह्यात गुरुवारी (16 सप्टेंबर) ही दुर्घटना घडली, असं वृत्त आहे. एका व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी (Funeral) काही जणांचा गट जात होता. ही अंत्ययात्रा चाललेली असतानाच काही जणांचा दुसरा एक गट तिथे आला. अंत्यविधीवेळचा नमाज सुरू असतानाच त्या दोन्ही गटांमध्ये जमिनीच्या विषयावरून (Land Dispute) वादावादी झाली. ही वादावादी संपण्याचं नाव घेईना. शेवटी त्या वादावादीचं रूपांतर हिंसेत झालं आणि अनेकदा गोळीबार (Round of Firing) झाला. गोळीबाराच्या या घटनेत आठ जण जागीच मृत्युमुखी पडले. तसंच 15 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून, त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेच्या ठिकाणी आठ जणांची अंत्ययात्रा निघण्याची दुर्दैवी वेळ या घटनेमुळे आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खैबर पख्तुनख्वा प्रांतातच एका रस्त्यावरून वाद झाला होता. त्या वादात एका महिलेसह एकाच परिवारातल्या पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर आणखी तीन जण जखमी झाले होते. दोन भावांच्या कुटुंबीयांमध्ये हा वाद झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं. पाकिस्तान कायमच अशा विचित्र आणि हिंसक घटनांमुळे चर्चेत असतो. क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतरच्या गेल्या काही काळात देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असून, देश वाईट परिस्थितीतून जात आहे. दहशतवाद हे कायमच पाकिस्तानपुढचं आव्हान आहे. त्यातच आता अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानचाही त्यात छुप्या पद्धतीने सहभाग असल्याचं बोललं जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात