जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / एकाने भेटायला बोलावलं अन् चौघांनी नर्सवर केला बलात्कार, देशाला हादरवणारी घटना

एकाने भेटायला बोलावलं अन् चौघांनी नर्सवर केला बलात्कार, देशाला हादरवणारी घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Gang Rape on Nurse: डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झालेल्या नर्सवर चार खेळाडूंनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आरोपीनं पीडितेला भेटायला बोलावून चार जणांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 30 मार्च: डेटिंग अ‍ॅपवरून ओळख (Friendship on dating app) झालेल्या नर्सवर चार खेळाडूंनी सामूहिक बलात्कार (4 swimmers raped nurse) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आरोपीनं पीडितेला भेटायला बोलावून चार जणांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी चारही आरोपींना अटक (4 Accused swimmers arrested) केली असून न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. चारही खेळाडू दिल्लीतील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते बंगळुरू याठिकाणी सरावासाठी आले होते. संबंधित धक्कादायक घटना कर्नाटकातील बंगळुरू शहरातील न्यू बेल रोडवरील एका हॉटेलच्या रुममध्ये घडली आहे. रजत, शिव राणा, योगेश कुमार आणि देव सरोही असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी दिल्लीतील रहिवासी असून सर्वजण व्यावसायिक जलतरणपटू आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वजण बंगळुरू याठिकाणी जलतरणाच्या ट्रेनिंगसाठी आले होते. आरोपी रजत आणि शिव राणा तीन महिन्यांपूर्वीच बंगळुरुला आले होते. ते एका भाड्याच्या घरात राहत होते. तर देव आणि योगेश गेल्याच आठवड्यात बंगळुरुत पोहोचले होते. हेही वाचा- नोकरीच्या बहाण्यानं पुण्यात आणलं अन्..; सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन तरुणींची सुटका, दोघांना अटक दरम्यान, 22 वर्षीय आरोपी रजत याची गेल्या आठवड्यात डेटिंग अ‍ॅपवर पीडित नर्सशी ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना मोबाइल नंबर दिल्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली होती. यातूनच आरोपी रजत याने पीडितेला भेटायला बोलावलं होतं. आरोपी रजतने पीडितेला न्यू बेल रोडवरील एका हॉटेलात भेटायला बोलावलं होतं. याठिकाणी डिनर केल्यानंतर पीडित तरुणी आरोपीसोबत त्याच्या रुमवर गेली होती. यावेळी आरोपीचे तीन मित्र आधीपासूनच रुमवर होते. हेही वाचा- अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकाला बाईने दप्तराने झोडपलं तर गावकऱ्यांनी लाथाडलं, VIDEO VIRAL यावेळी संबंधित सर्वांनी जबरदस्ती करत पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपी पीडितेनं केला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित नर्सवर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. चारही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. हा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला असून आता यावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात